कल्याण पश्चिमेत गॅस सिलेंडर स्फोटात एक जण गंभीर जखमी

सिलेंडर स्फोटात कुष्णकुमार बहनवाल हे गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुले बिल्डिंगच्या खाली गेली असल्याने संभाव्य दुखापती पासून बचविले. कुष्णकुमार बहनवाल यांना उपाचारर्थ रूग्णालयात नेले.

    कल्याण: कल्याण पश्चिमेतील घरगुती गॅस सिलेंडर गळतीमुळे झालेल्या स्फोटात एक जण गंभीर भाजल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. घटनेची माहित्ती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग लागले दोन सिलेंडर विझवत खाली आणत आगीवर नियंत्रण मिळवले. अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख विनायक लोखंडे यांनी दिली.
    कल्याण पश्चिमेतील कोळवली परिसरातील सिसोदिया आर्केड इमारतील ३रा माळ्यावर राहणाऱ्या बहनवाल यांच्या घरातील घरगुती गॅस गळतीमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यामध्ये स्वयंपाक घरातील फर्निचर घरातील इलेक्ट्रॉनिक समानाचे आगीमुळे प्रचंड नुकसान झाले.

    सिलेंडर स्फोटात कुष्णकुमार बहनवाल हे गंभीर जखमी झाले.सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुले बिल्डिंगच्या खाली गेली असल्याने संभाव्य दुखापती पासून बचविले. कुष्णकुमार बहनवाल यांना उपाचारर्थ रूग्णालयात नेले. असून पोलीस तपासाअंती नेमकी घटना कशामुळे घडली हे सामारे येईल.