खासदार नवनीत राणा
खासदार नवनीत राणा

अमरावतीच्या (Amravati). अपक्ष खासदार (independent MP Navneet Rana) नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र (the caste certificate) अवैध ठरविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला (Mumbai High Court decision) सर्वोच्च न्यायायलयाने (The Supreme Court) मंगळवारी स्थगिती दिली.

    मुंबई (Mumbai).  अमरावतीच्या (Amravati). अपक्ष खासदार (independent MP Navneet Rana) नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र (the caste certificate) अवैध ठरविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला (Mumbai High Court decision) सर्वोच्च न्यायायलयाने (The Supreme Court) मंगळवारी स्थगिती दिली. यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी कायम राहिली आहे. यामुळे राणा यांच्या विरोधकांमध्ये (opponents) एकच खळबळ माजली आहे.

    दरम्यान, नवनीत कौर राणा यांनी विरोधकांवर चांगली टीका केली होती. निर्णयाविरोधात जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे आणि माझे खच्चीकरण करण्याचे काम केले आहे. हे एक राजकीय षडयंत्र आहे. मी संघर्ष करणारी महिला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल आणि तेथे सत्याचाच विजय होईल, असे त्यांनी म्हटले होते.

    सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताना म्हटलं आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत कौर राणा यांचे जात पडताळणी समितीकडे प्रकरण पाठविणे गरजेचे होते. जात पडताळणी करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीचा आहे, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

    मुंबई उच्च न्यायालयाने प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर खासदार नवनीत कौर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल अन्यायकारक आहे. मी दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी नवनीत कौर राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये केली होती.

    न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीला कायदेशीरदृष्ट्या पूर्ण मान्यता आणि अधिकार आहेत, अशा न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची चौकशी केली. या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे हे जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिल्याचंही नवनीत कौर राणा यांनी पत्रामध्ये म्हटले होते.