राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही : प्रविण दरेकर यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्यव्यापी मराठा आरक्षण  गोलमेज परिषदेचे  नवी मुंबई माथाडी भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय मंत्री खासदार रामदासजी आठवले, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार  नरेंद्रजी पाटील आदी नेते उपस्थित होते. या परिषदेचे आयोजन सुरेश पाटील व विजयसिंह महाडिक यांनी केले होते.      

  मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ कायदा केला नाही तर तो उच्च न्यायालयात टिकवून सुद्धा दाखवला. पण महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे आरक्षण टिकवता आले नाही, त्यामुळे मराठा समाजाला आपल्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित रहावे लागले अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्यव्यापी मराठा आरक्षण  गोलमेज परिषदेचे  नवी मुंबई माथाडी भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय मंत्री खासदार रामदासजी आठवले, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार  नरेंद्रजी पाटील आदी नेते उपस्थित होते. या परिषदेचे आयोजन सुरेश पाटील व विजयसिंह महाडिक यांनी केले होते.
   
  आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही

  परिषदेत मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, फडणवीस सरकारने मागासवर्ग आयोग गठीत केले , लाखो पुरावे गोळा केले, मराठा समाज शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे सिद्ध केले. पण सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान दिल्यानंतर सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे महाविकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही.

  परिपूर्ण अहवाल तयार करण्याची गरज

  सर्वप्रथम आरक्षण देण्याचे काम राणे समितीच्या माध्यमातून राणे यांनी केले. हे विसरता येणार नाही. राणे साहेब होते म्हणून एवढे झाले. नाकर्तेपणा, निष्काळजीपणा आणि केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम राज्य सरकार करत आहे. ज्या आयोगाच्या चुका दाखवल्या तो आयोग पुन्हा दुरुस्ती करून एक परिपूर्ण अहवाल तयार करण्याची गरज होती. पण प्रक्रिया पूर्ण न केल्याशिवाय केंद्राकडे बोट दाखवणे दुर्दैवी आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.