शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या मुद्यावर विरोधकांचा विधान परिषदेतून सभात्याग

विधान परिषदेत लक्षवेधी सूचने मार्फत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना वीज जोडण्या आणि बोगस बिले पाठवल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीची परवड होत असून पैशांची चणचण आहे. केंद्र सरकारच्या नियमांमुळे पैसे उभारताना मर्यादा येत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री उत्तर देत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जळगाव मध्ये शेतकऱ्याला वीज जोडणी दिली नसताना ७३ हजार रुपये बिल दिल्याचे सांगितले. त्याच वेळी सत्ताधारी बकावरून चोरून वीज घेतली जाते त्याचे काय असा प्रश्न उपस्थित झाला. याच वाक्यावरून आक्रमक होत विरोधकांनी गदारोळ केला त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत सभात्याग केला.

    मुंबई : शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या मुद्यावर विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या सदस्यानी सभात्याग केला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा मुद्दा मांडला होता. त्यावर चर्चा न होता सत्ताधारी बाजूने शेतकरी वीज चोरतात त्याचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने संतप्त विरोधकांनी सभात्याग केला.

    विधान परिषदेत लक्षवेधी सूचने मार्फत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना वीज जोडण्या आणि बोगस बिले पाठवल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीची परवड होत असून पैशांची चणचण आहे. केंद्र सरकारच्या नियमांमुळे पैसे उभारताना मर्यादा येत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री उत्तर देत असताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका जळगाव मध्ये शेतकऱ्याला वीज जोडणी दिली नसताना ७३ हजार रुपये बिल दिल्याचे सांगितले. त्याच वेळी सत्ताधारी बकावरून चोरून वीज घेतली जाते त्याचे काय असा प्रश्न उपस्थित झाला. याच वाक्यावरून आक्रमक होत विरोधकांनी गदारोळ केला त्यांनी या वक्तव्याचा निषेध करत सभात्याग केला.

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आमचे सदस्य गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी वीज जोडणी तोडल्याबाबत लक्षवेधी आणली होती. त्याशिवाय वीज बिलातही अनेक चुका आहेत, असे आम्ही सांगितले. मात्र, त्यावर चर्चा न करता एका आमदाराने  शेतकरी चोऱ्या करतात त्याच काय असा सवाल या वेळी उपस्थित केला. शेतकऱ्यांना चोर म्हटल्याच्या निषेधार्थ सभात्याग केला असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले.