शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत

गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, प्रतिक्रिया सर्वत्रच विनोद व रहस्यमय असे मनोरंजन सुरू आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बऱ्याच काळानंतर ते मोकळा श्वास घेतील. कोरोनामुळे त्यांच्या परदेशवाऱ्यांवर बंधने आली. प. बंगाल निवडणुकांच्या काळात ते एकदा बांगलादेशात जाऊन आले, पण बांगलादेशाला ‘परदेश’ मानायला कोणी तयार नाही.

  राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सत्ताधारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यात खडाजंगी सुरु आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून राज्यातील विरोधी पक्ष भाजपला जोकर म्हटलं आहे.

  काय म्हटलंय संजय राऊत यांनी

  महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असे मला वाटते. चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हा आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली, पण कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले! एकंदरीत सगळीच गंमत आहे.

  गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली की महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा आणि नाटय़गृहांची खरेच गरज आहे काय, असे वाटते. सर्वत्रच विनोद व रहस्यमय असे मनोरंजन सुरू आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बऱ्याच काळानंतर ते मोकळा श्वास घेतील. कोरोनामुळे त्यांच्या परदेशवाऱ्यांवर बंधने आली.

  प. बंगाल निवडणुकांच्या काळात ते एकदा बांगलादेशात जाऊन आले, पण बांगलादेशाला ‘परदेश’ मानायला कोणी तयार नाही. इंदिरा गांधी यांनीच निर्माण केलेला हा देश, पण मोदी आता अमेरिकेत गेले. युनोत त्यांचे भाषण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोव्हिशिल्ड’च्या लसीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली. ज्यांनी या लसीचे दोन डोस घेतले त्यांनाच आंतरराष्ट्रीय प्रवास करता येईल. त्यामुळे अनेक विद्यार्थी, जे परदेशांत शिकण्यासाठी जातात, उद्योजक मंडळींचे वांदे झाले.

  दुसरीकडे ‘कोव्हॅक्सिन’ घेतलेल्या अनेकांना युरोप-अमेरिकेच्या विमानतळावरून त्यांच्या देशात प्रवेश करू दिला गेला नाही. आपले पंतप्रधान मोदी यांनीही ‘कोव्हॅक्सिन’चेच दोन डोस घेतले आहेत, पण तरीही ते खास विमानाने अमेरिकेत पोहोचले. नियम फक्त सामान्यांना, मोठय़ांना नाही, असे कोणी विचारले तर भारतीय जनता पक्षाचे लोक यावर सांगतील, ‘‘छे छे, मोदी है तो मुमकीन है! मोदींना कोण अडवणार?’’ हेसुद्धा एक मनोरंजन आहे. राजाला आणि राज्यकर्त्याला सत्य सांगण्याची हिंमत आज कुणात दिसत नाही. राजाला काय आवडेल आणि काय आवडणार नाही याचा विचार करण्यापेक्षा आपले कर्तव्य काय याला जो महत्त्व देतो आणि वेळ आल्यास राजाला न आवडणारी, पण हितकारक सत्ये त्याला सांगतो, त्याचाच राजाला खरा आधार असतो. आज तसे राजेही नाहीत व सत्य सांगणारेही उरले नाहीत. एकंदरीत सगळीच गंमत आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.