मुंबईच्या सीएसएमआयएकडून चविष्ट स्ट्रीट फूड महोत्सवाचे आयोजन

(CSMIA)मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबईच्या प्रसिद्ध मिसळीपासून (Misal) ते चविष्ट मुंबई सँडविचपर्यंत (Sandwich), बर्फाच्या गोळ्यापासून (Ice Gola) ते जिभेला पाणी आणणाऱ्या चाटपर्यंत (chat) विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचा आनंद घेता येईल. तुम्हाला टर्मिनल २ (Terminal 2) च्या डोमेस्टिक एसएचए (सिक्युरिटी होल्डिंग एरिया) येथे हे चविष्ट खाद्यपदार्थ सकाळी १० ते रात्री ९ या दरम्यान प्रादेशिक शोकेसमध्ये मिळू शकतील.

    मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) वर्षातील सर्वोत्तम स्ट्रीट फूड महोत्सवासाठी (Street Food Festival) येण्यास सज्ज व्हा. हा फूड फेस्टिव्हल मुंबई स्ट्रीट फूडची (Mumbai Street Food) आवड असलेल्या सर्व खवय्यांसाठी एक पर्वणीच आहे आणि तो १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहील.

    (CSMIA)मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबईच्या प्रसिद्ध मिसळीपासून (Misal) ते चविष्ट मुंबई सँडविचपर्यंत (Sandwich), बर्फाच्या गोळ्यापासून (Ice Gola) ते जिभेला पाणी आणणाऱ्या चाटपर्यंत (chat) विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचा आनंद घेता येईल. तुम्हाला टर्मिनल २ (Terminal 2) च्या डोमेस्टिक एसएचए (सिक्युरिटी होल्डिंग एरिया) येथे हे चविष्ट खाद्यपदार्थ सकाळी १० ते रात्री ९ या दरम्यान प्रादेशिक शोकेसमध्ये मिळू शकतील.

    सीएसएमआयएवर यंदा प्रथमच हा प्रयोगशील स्ट्रीट फूड महोत्सव आयोजित केला जात आहे. त्यातून मुंबईची चव या शहरात प्रवास करणाऱ्या लोकांना चाखायला मिळाली नसल्यास त्याचा आनंद घेता येईल. या उपक्रमात मुंबईतील विविध सर्वोत्तम ठिकाणचे स्ट्रीट फूड खायला मिळेल- मग तो दादर शिवाजी पार्क येथील लोकप्रिय चाट कॉर्नर असेल किंवा मग ठाण्याची स्वादिष्ट मामलेदार मिसळ असो. प्रवाशांना विमानतळावर राहून मुंबईच्या ऑथेंटिक चवींचा आनंद घेता येईल. तेही मुंबईच्या खोलवर रूजलेल्या ब्रँड्सकडून.

    प्रवाशांना विमानतळावर खऱ्या अर्थाने मुंबईचा आनंद घेता येईल. सीएसएमआयएकडून आपल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते आणि त्यामुळे हा फेस्टिव्हल कोविडशी संबंधित सर्व नियम आणि प्रोटोकॉल्सचे पालन करून आयोजित केला जाईल. उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे असेल.

    सीएसएमआयएकडून प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव चांगला करण्याचे आणि प्रवाशांसोबत सहभागी होण्यासाठी नवनवीन उपक्रम आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. सीएसएमआयएसाठी प्रवाशांचा आनंद हा फक्त गरज नाही तर ती आवश्यकता आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या सोयीने मुंबईतील सर्वोत्तम स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता.