२० ते २७ जून दरम्यान ऑनलाईन योगासन स्पर्धेचे आयोजन

एकूण ७ गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रत्येक गटाला दिल्या गेलेल्या ४ आसनांपैकी कोणतेही २ आसन तसेच २ सूर्यनमस्कार स्पर्धकांना करायचे आहेत. संपूर्ण व्हिडिओ हा जास्तीत जास्त ३ मिनिटांचा असणे आवश्यक असून व्हिडिओ ची साइज १५० MB पेक्षा अधिक नसावी, याची स्पर्धकांनी कृपया नोंद घ्यावी. २० जून ते २७ जून २०२१ या कालावधी मध्ये हे व्हिडिओ पाठवायचे आहेत.

  मुंबई : रा. स्व. संघ जनकल्याण समिती, मुंबई महानगर आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्यानिमित्ताने भव्य ऑनलाईन योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २० जून ते २७ जून २०२१ या कालावधी मध्ये आयोजित करण्यात आली असून केवळ मुंबईतील नागरिकच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

  एकूण ७ गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रत्येक गटाला दिल्या गेलेल्या ४ आसनांपैकी कोणतेही २ आसन तसेच २ सूर्यनमस्कार स्पर्धकांना करायचे आहेत. संपूर्ण व्हिडिओ हा जास्तीत जास्त ३ मिनिटांचा असणे आवश्यक असून व्हिडिओ ची साइज १५० MB पेक्षा अधिक नसावी, याची स्पर्धकांनी कृपया नोंद घ्यावी. २० जून ते २७ जून २०२१ या कालावधी मध्ये हे व्हिडिओ पाठवायचे आहेत.

  https://forms.gle/CctdQYehUbzRoTEx7 या गुगल फॉर्म लिंक वर आवश्यक माहितीसह स्पर्धकांनी व्हिडियो पाठवायचा आहे. प्रत्येक गटानुसार ३ पुरस्कार देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9867153651, 9967037493, 9004658483 या क्रमांकावर संपर्क साधावा.

  गट १ आणि २ ने केवळ योगासन करायचे आहेत. गट ३ ते ७ ने योगासन आणि सूर्यनमस्कार दोन्ही करणे अनिवार्य आहे . गट क्र. १ (वय वर्ष ५ ते ८ चक्रासन, पश्चिमोत्तानासन, मयूरासन, बद्ध हस्तपद्मासना. गट क्र. २ (वय वर्ष ९ ते १२ ) जानुशीर्षासन, मयूरासन, सर्वांगासन, चक्रासन. गट क्र. ३ (वय वर्ष १३ ते १६ ) कुक्कुटासन, पश्चिमोत्तानासन, गोमुखासन, अर्ध मच्छिद्रासन. गट क्र. ४ (वय वर्ष १७ ते २५ वर्ष) धनुरासन, अर्ध मत्स्येन्द्रासन, बद्ध हस्तपद्मासन, मयूरासन. गट क्र. ५ (वय वर्ष २६ ते ३५ वर्ष) गरुड़ासन, उष्ट्रासन, चक्रासन, बकासन. गट क्र. ६ (वय वर्ष३६ से ५० वर्ष) सुप्त वज्रासन, हलासन, वृश्चिकासन, भू नमनासन. गट क्र. ७ (वय वर्ष ५१ पासून अधिक) शलभासन, मत्स्यासन, अर्ध मत्स्येन्द्रासन, पद्म सर्वांगासन.

  सहयोगी संस्थामध्ये श्री अंबिका योगाश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारत विकास परिषद, सेवा सहयोग फाउंडेशन, आरोग्य भारती, सक्षम, कच्छ युवक संघ, माय ग्रीन सोसायटी, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (मेवाड) यांचा सहभाग आहे.

  Organizing online yoga competition from 20th to 27th June