मुंबईत तीन लाख सेल्फ किटपैकी ९८ हजार ९५७ नागरिकांनीच अहवाल केले अपलोड

सेल्फ टेस्ट किटमधून चाचण्या केलेल्या लोंकाची माहिती समोर येत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांनी अशा चाचण्या केल्या आहेत त्यांनी आपली माहिती सेल्फ टेस्ट किटच्या ऍपवर अपलोड करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. किट बनवणारे मॅनुफॅक्चरर आणि डिस्ट्रिब्युटर यांना किट कोण विकत घेत आहे त्याचे नाव, त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    • सुमारे दोन लाख अहवालाची पालिकेकडे नोंदच नाही

    मुंबई : मुंबईत कोरानाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यात ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. चाचणी केल्यास कोरोना पॉझिटिव्ह येण्याची भीती असल्याने लाखो मुंबईकरांनी सेल्फ टेस्ट किटच्या माध्यमातून चाचण्या केल्या. मुंबईत सुमारे ३ लाख किटची विक्री झाली असून यातील ९८ हजार ९५७ नागरिकांनीच आपले अहवाल ऍपवर अपलोड केल्याची पालिकेकडे नोंद झाली आहे. त्यामुळे उर्वरित तब्बल २ लाख लोकांच्या अहवालाची नोंदच झाली नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मुंबईत डिसेंबरपासून कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली आहे. अनेकजण सर्दी, खोकळा, ताप अंगदुखीने त्रस्त आहेत. जवळपास कोरोनाचे लक्षणे साऱखी मिळती जुळती असल्याने नागरिकांनी कोरोना चाचणी न करता सेल्फ टेस्टिंग किटचा आधार घेतला आहे. मुंबईत अशा तीन लाखाहून अधिक किट विकल्या गेल्याची माहिती आहे. यात आतापर्यंत एकूण ९८ हजार ९५७ नागरिकांनी ही टेस्ट केली असून त्यामधून ३ हजार १४९ नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. मात्र टेस्ट करूनही उर्वरित नागरिकांनी आपली माहिती पालिकेकडे दिली नसल्याचे समोर आले आहे.

    माहिती अपलोड करण्याचे आवाहन

    सेल्फ टेस्ट किटमधून चाचण्या केलेल्या लोंकाची माहिती समोर येत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांनी अशा चाचण्या केल्या आहेत त्यांनी आपली माहिती सेल्फ टेस्ट किटच्या ऍपवर अपलोड करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. किट बनवणारे मॅनुफॅक्चरर आणि डिस्ट्रिब्युटर यांना किट कोण विकत घेत आहे त्याचे नाव, त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मॅनुफॅक्चरर आणि डिस्ट्रिब्युटर यांनी ती माहिती पालिकेला सादर करावी. ज्यांना या किट विकल्या आहेत त्यांची माहिती मिळाल्यास पालिकेला त्यांच्यापर्यंत पोहचता येईल. गेल्या दहा दिवसात २५ हजार किट आल्या आहेत. त्यांच्यापैकी काहींनीच आपली माहिती अपलोड केली आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली