प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबईत मागील आठवडापासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी तर रुग्णसंख्येने २५०० पर्यंतचा आकडा गाठला. त्यामुळे पालिका व राज्य सरकार सतर्क झाले आहे. कोरोना रुग्णसंख्येचा दुपटीने उद्रेक होत असून त्या अनुषंगाने बुधवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी थर्टी फर्स्टवर करडी नजर ठेवा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले. थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पालिकेने केलेल्या तयारीचा ठाकरे यांनी आढावा घेतला(Outbreak of corona outbreak in Mumbai! Excitement over finding 2496 corona patients in one day).

    मुंबई : मुंबईत मागील आठवडापासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी तर रुग्णसंख्येने २५०० पर्यंतचा आकडा गाठला. त्यामुळे पालिका व राज्य सरकार सतर्क झाले आहे. कोरोना रुग्णसंख्येचा दुपटीने उद्रेक होत असून त्या अनुषंगाने बुधवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी थर्टी फर्स्टवर करडी नजर ठेवा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले. थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पालिकेने केलेल्या तयारीचा ठाकरे यांनी आढावा घेतला(Outbreak of corona outbreak in Mumbai! Excitement over finding 2496 corona patients in one day).

    मुंबईत गेल्या २४ तासांत २४९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पालिका अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावली होती. बैठकीत त्यांनी दररोज २००० हून अधिक रुग्ण आढळून येतील, असे संकेत देत आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासह औषधे आणि ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या योजनेवर काम करण्याचे निर्देश दिले. याशिवाय लसीकरणावरही लक्ष केंद्रीत करण्यावर जोर दिला.

    ही तिसरी लाट आहे का, असे आदित्यला विचारले असता ते म्हणाले की, हे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ ठरवतील, परंतु मुंबईतील अनेक वरिष्ठ डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिसरी लाट आधीच सुरू झाली आहे. बुधवारी मुंबई धारावीत १७ रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी सावध राहून कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

    ५४ हजार खाटा उपलब्ध

    ओमिक्रॉनबाबत सुरक्षा घेणे गरजेचे झाले आहे. ते हलक्यात घेता येणार नाही. आणखी केसेस आल्यास इमारती पूर्णपणे सील केल्या जातील. सध्या रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये ५४ हजार खाटा उपलब्ध आहेत. केसेस वाढत आहेत पण घाबरण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

    लॉकडाऊन, शाळा बंदबाबत अद्याप निर्णय नाही

    आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत लॉकडाऊन किंवा शाळा बंद करण्याचा अद्याप विचार झालेला नाही. मात्र प्रकरणे अशीच वाढत राहिल्याने पुढील आठवड्यात शाळा बंद करण्याचा विचार होऊ शकतो. ते म्हणाले की, मुंबईत एका दिवसात ज्या प्रकारे कोरोनाचे रुग्ण २००० हून अधिक होत आहेत, ती तिसऱ्या लाटेची सुरुवात मानली जाऊ शकते. त्यामुळे पालिकेला आपली तयारी आणखी सुधारावी लागणार आहे.

    …तर मुंबईत इमारती सील होतील

    मुंबईत कोरोनाने कहर सुरू केला असून गेल्या आठ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याने मुंबईकरांत चिंता आहे. जर रूग्ण वाढ अशीच सुरू राहिली तर मुंबईत इमारती सील करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. तसेच, ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. मात्र, रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण त्या तुलनेत कमी असल्यामुळे ही आरोग्य यंत्रणेसाठी आणि प्रशासनासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, असे असले, तरी लोकांना सर्तकतेचे आवाहन त्यांनी केले.

    गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी ३ जानेवारीपासून महाविद्यालये, शाळांमध्ये लसीकरणाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी बूस्टर डोसचीही व्यवस्था केली जात आहे.

    - आदित्य ठाकरे, पर्यावरणमंंत्री