New Covid variant Omicron: Dombivali followed by Pune found six patients of Omicron; Excitement in Maharashtra

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमीक्रोनचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मंगळवारी एकाच दिवशी नव्या व्हेरिएंटचे ८ नवे रुग्ण समोर आले ज्यापैकी ७ प्रकरणे मुंबई तर एक वसई विरारमध्ये आढळला. प्राथमिक माहितीनुसार, यापैकी एकाही व्यक्तीने विदेश प्रवास केलेला नाही. भारतात आजवर ऑमीक्रोनचे ५३ बाधित असून यात सर्वाधिक महाराष्ट्रातील २८ बाधितांचा समावेश आहे. २८ पैकी ९ जण बरेही झाले आहेत(Outbreak of Omicron in the country Outbreak in Maharashtra too! Concerns over finding 8 new patients on the same day).

  मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमीक्रोनचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मंगळवारी एकाच दिवशी नव्या व्हेरिएंटचे ८ नवे रुग्ण समोर आले ज्यापैकी ७ प्रकरणे मुंबई तर एक वसई विरारमध्ये आढळला. प्राथमिक माहितीनुसार, यापैकी एकाही व्यक्तीने विदेश प्रवास केलेला नाही. भारतात आजवर ऑमीक्रोनचे ५३ बाधित असून यात सर्वाधिक महाराष्ट्रातील २८ बाधितांचा समावेश आहे. २८ पैकी ९ जण बरेही झाले आहेत(Outbreak of Omicron in the country Outbreak in Maharashtra too! Concerns over finding 8 new patients on the same day).

  निम्म्याहून अधिक रुग्ण राज्यात

  महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहेत. सोमवारी कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले. त्यापैकी एक लातूरचा तर एक पुण्याचा आहे. अशा स्थितीत आता राज्यातील ऑमीक्रोन रुग्णांची एकूण संख्या 28 झाली आहे. देशात ऑमीक्रोनची 38 प्रकरणे होती, आता दोन नवीन रुग्णांसह ही संख्या 40 झाली आहे.

  नाशकात आफ्रिकन नागरिक बाधित

  कोल्हापूर, लातूरपाठोपाठ आता नाशिककरांची चिंता वाढली आहे. पश्चिम आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला नागरिक हा पश्चिम आफ्रिकेचा नागरीक आहे. पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातला नागरिक नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत आला होता. गेल्या तीन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आल्याने त्याची कोरोना चाचणी केली होती तीन नागरिकांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

  भारतात ऑमीक्रोन विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या  ५३ वर पोहोचली

  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ऑमीक्रोनमुळे संपूर्ण जग चिंतेत असून आता या विषाणूची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे चित्र येत आहे. या विषाणूचे दिल्लीत नव्यान चार, तर राजस्थानमध्ये आठ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतात ऑमीक्रोन विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. पहिला रूग्ण कर्नाटकमध्ये आढळून आला होता. त्यानंतर आता या विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण इतर राज्यांमध्येदेखील आढळून येत आहेत.

  बुस्टर डोजबाबत…

  दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी झाली. करोनावरील लसीचा बूस्टर डोसबाबत ही सुनावणी झाली. बूस्टर डोस देण्याबाबत शास्त्रीय पुरावे मिळवले जात आहे. अभ्यास केला जात आहे. यानुसार बूस्टर डोस दिला जावा की नाही? याबाब अधिक स्पष्टता येईल, असे केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात सांगितले.