मुंबईला कोरोना बरोबरच साथीच्या आजारांचा धोका, गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो लेप्टो चिकनगुनिया कावीळ हे आजार पावसाळ्यात उद्भवतात. परंतु पावसाळा जाऊन दोन महिने होत आले तरी साथीचे आजार झपाटयाने वाढत आहेत. १ ते २६ डिसेंबरपर्यंत मलेरिया,२३५, गॅस्ट्रो - ३४९, डेंग्यू - ३७ कावीळ - ३०, चिकनगुनिया - १०, लेप्टो - ४ रुग्ण आढळल्याने मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.दरम्यान, एच वन एन वन रुग्ण आटोक्यात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले नाहीत, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.दरम्यान, साथीचे आजार बळावत असतानाच गेल्या वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूची लागण होऊन ३ जण दगावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

    मुंबई – कोरोनाशी लढा सुरू असतांनाच मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला. याविरोधात महापालिका झुंज देत असतानाच कावीळ, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो चिकनगुनिया हे आजार बळावत आहेत.२६ दिवसांत साथीच्या आजारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

    गेल्या वर्षी म्हणजेच २०२० च्या तुलनेत यावर्षी २०२१ मध्ये पावसाळी आजारांचे प्रमाण १८ टक्के वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरियाचे १३३, डेंग्यू ७४४, गॅस्ट्रो ४७७, कावीळ ३८, चिकनगुनिया ७८, एच१एन१ २० रुग्ण वाढले. लेप्टो चे रुग्ण कमी १६ रुग्णसंख्या कमी झाले असून मृत्यू कमी झाले आहेत.

    मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो लेप्टो चिकनगुनिया कावीळ हे आजार पावसाळ्यात उद्भवतात. परंतु पावसाळा जाऊन दोन महिने होत आले तरी साथीचे आजार झपाटयाने वाढत आहेत. १ ते २६ डिसेंबरपर्यंत मलेरिया,२३५, गॅस्ट्रो – ३४९, डेंग्यू – ३७ कावीळ – ३०, चिकनगुनिया – १०, लेप्टो – ४ रुग्ण आढळल्याने मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.दरम्यान, एच वन एन वन रुग्ण आटोक्यात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळलेले नाहीत, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.दरम्यान, साथीचे आजार बळावत असतानाच गेल्या वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूची लागण होऊन ३ जण दगावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.