Thaman of mysterious fever in Uttar Pradesh; Sensation of 100 deaths

मुंबईत साथीच्या आजारांनी डोकेवर काढले असून मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो चिकनगुनिया या आजारांचे रुग्ण गेल्या २१ दिवसांत तिप्पट झाले आहेत(Outbreaks of malaria, dengue, gastroenteritis and chikungunya in Mumbai; Triple the number of patients in 21 days). त्यामुळे या आजारांचे संकट अद्याप कायम आहे. मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

    मुंबई : मुंबईत साथीच्या आजारांनी डोकेवर काढले असून मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो चिकनगुनिया या आजारांचे रुग्ण गेल्या २१ दिवसांत तिप्पट झाले आहेत(Outbreaks of malaria, dengue, gastroenteritis and chikungunya in Mumbai; Triple the number of patients in 21 days). त्यामुळे या आजारांचे संकट अद्याप कायम आहे. मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

    मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी साथीच्या आजाराचा ताप वाढतो आहे. गेल्या २१ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली असून १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे २३४, डेंग्यू – ९१, गॅस्ट्रो – २००, चिकनगुनीया – १२ तर लेप्टोचे ६ रुग्ण आढळले. मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका कायम आहे.

    गेल्या दीड वर्षापासून मुंबईकर कोरोना विरोधात लढा देत आहेत. प्रभावी उपचार पद्धती, नियमांची कडक अंमलबजावणी आदी उपाययोजनांमुळे कोरोनाची पहिली व दुस-या लाटेला थोपवण्यात व तिसरी लाट येण्यापूर्वीच परतवण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र तरीही कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या नियमाचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे.

    सध्य़ा कोरोना नियंत्रणात असला तरी पावसाळ्यात उद्भवणा-या साथीच्या आजारांचे संकट आजही कायम आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी ज्या पद्धतीने खबरदारी घेतली त्याचप्रमाणे साथीच्या आजार रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.