ओझोन थेरेपी वरदान!; संसर्ग नियंत्रित करण्यात फारच प्रभावी : डॉ. मिली शहा

रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार असलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, थ्रोम्बोसिस, डोकेदुखी,फुफुसाला संसर्ग, अंगदुखी आणि श्वसनात अडचणी असे प्रकार उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी ओझोन थेरपी संसर्ग नियंत्रित करण्यात फारच प्रभावी असल्याचा दावा डॉ मिली यांनी केला आहे.

  मुंबई: बुधवारी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून पुढील १० दिवसांकरिता ओझोन फोरम ऑफ इंडिया तर्फे अंधेरीच्या बिसलेरी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरात ओझोन थेरपी वापरून रुग्णांना वेगाने बरे होण्यात मदत करण्यात येणार असल्याची घोषणा ओझोन फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा डॉ. मिली शहा यांनी केली आहे.

  रक्तवाहिन्यांशी संबंधित विकार असलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे, थ्रोम्बोसिस, डोकेदुखी,फुफुसाला संसर्ग, अंगदुखी आणि श्वसनात अडचणी असे प्रकार उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी ओझोन थेरपी संसर्ग नियंत्रित करण्यात फारच प्रभावी असल्याचा दावा डॉ मिली यांनी केला आहे.

  कोविड आणि क्षयरोगामधून झटपट रिकव्हरीसाठी डॉक्टर ओझोन थेरपीची शिफारस करु लागले आहेत कोविड-१९ नंतर ओझोन थेरपीची १५ सत्र करावीत,असे डॉ सांगतात.

  ओझोन थेरपी द्वारे शरीरातील अँटीऑक्सिडंट आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवली जाते आणि म्हणून कोविड-१९ करीता ही थेरपी अत्यंत प्रभावी ठरत आहे .

  ओझोन फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा डॉ. मिली शहा म्हणाल्या की,ओझोन फोरम गेल्या १८ वर्षांपासून या थेरपीबाबत संशोधन करत आहे. ओझोन फोरमने कोविड-१९ च्या उपचारांबाबत २ महत्त्वाच्या चाचण्या केल्या असून यातील एक पुण्यातील लोकमान्य रुग्णालयात आणि दुसरी न्यूरोजेन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट येथे करण्यात आली आहे.

  कोविड १९ या भयंकर साथीला तोंड देत असताना, आपण पारंपरिक औषधे आणि बरे करण्याच्या नैसर्निक पद्धतींचा उपयोग केला पाहिजे.आणि म्हणून परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारी ओझोन थेरपी सर्वसामान्यांसाठी एक पर्वणी आहे .अधिकाधिक डॉक्टर आणि लोकांपर्यंत ही थेरपी पोहोचल्यास त्याचा आपल्या देशाला फायदाच होईल.

  न्यूरोसर्जरी स्पेशालीस्ट डॉ आलोक शर्मा, म्हणाले “न्यूरोजेन येथे आरोग्य सेवकांवर घेण्यात आलेल्या चाचणीच्यावेळी मी ओझोन फोरम ऑफ इंडियाचा मुख्य संशोधक म्हणून मी काम पाहिले आहे. आमच्या दोन्ही वैद्यकीय चाचण्यामध्ये ओझन थेरपीबाबत चांगली प्रगती दिसली आहे. आम्ही संसर्ग झालेल्या आरोग्य सेवकांवर ओझोन थेरपीचा प्रयोग केला आणि ही थेरपी घेतलेले आरोग्य सेवक लवकर बरे झाले आहेत. आता आपल्या देशात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना, अन्य औषधांसोबतच लवकर बरे होण्यासाठी ही थेरपी योग्य आहे.

  त्याचप्रमाणे ड्रग रिझिस्टंटमधील स्पेशालिस्ट आणि क्षयरोग व अँटीऑक्सिडंट थेरपिस्ट डॉ. ललित कुमार आनंदे यांनी म्हणाले की, “क्षयरोगामध्ये फुफुसावर घातक अदृश्य परिणाम होतात, अनेकदा छातीत पू होतो. त्यामुळे नैराश्यही येऊ शकते. अशा वेळी ओझोन थेरपी ही फारच उपयुक्त आहे.”