The danger increased even more; Corona becomes 'Delta Plus'

देशात जीवघेण्या कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. परंतु आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आता केवळ केरळ, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांपुरती मर्यादित नाहीत. तर इतर राज्यात देखील याचा फैलाव होत आहे. त्यामुळे केंद्राने खबरदारीचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस’चे रुग्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, जम्मू आणि कर्नाटकात आढळले आहेत.

  दिल्ली : देशात जीवघेण्या कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे कमी होत आहेत. परंतु आता कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आता केवळ केरळ, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांपुरती मर्यादित नाहीत. तर इतर राज्यात देखील याचा फैलाव होत आहे. त्यामुळे केंद्राने खबरदारीचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस’चे रुग्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, जम्मू आणि कर्नाटकात आढळले आहेत.

  केंद्राचे तीन राज्यांना पत्र

  केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यांनी जागरुक राहण्याची गरज आहे, तसेच प्रतिबंधावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. या प्रकाराबाबत केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश सरकारलाही पत्र लिहिले आहे.

  दोन रूग्ण पूर्णपणे बरे

  महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रूग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र आता समाधानकारक बाब म्हणजे यापैकी 2 रूग्ण बरे झाले आहेत.

  रुग्णसंख्या

  महाराष्ट्रत 21, मध्यप्रदेश 6, केरळ 3, तामिळनाडू 3, कर्नाटक 2, आंध्रप्रदेश 1, पंजाब 1 तर जम्मूत एक रुग्ण सापडला आहे.

  9 देशात पसरला व्हेरिएंट

  भारताव्यतिरिक्त आणखी नऊ देशांत डेल्टा प्लस प्रकार आढळला आहे. अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया येथे ‘डेल्टा प्लस’ प्रकार आढळून आला आहे.