‘…तर OBC आरक्षण टिकलं असतं’ पंकजा मुंडे यांचा राज्य सरकारवर घाणाघात

पत्रकार परिषदेत पंकजा म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारने अद्यापही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नाही. अद्यापही इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यामागे सरकारचा हात आहे. सरकारने योग्य निर्णय घेतले असते तर संप चिघळला नसता. हे तीन तिघाडी सरकार असून यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. सरकारने योग्य पावलं उचलली असती तर OBC आरक्षण टिकलं असतं. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

    “आयोगाला पुरेसा निधी देण्याची गरज असतानाही, सरकारनं 15 महिन्यांमध्ये 7 वेळा तारखा बदलून मागितल्या. त्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. यापूर्वीही मी म्हटलं होतं की, या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचंय की, काय? ओबीसी आरक्षण संपुष्टात आणायचंय की, काय? असा प्रश्न राज्यातील ओबीसींमध्ये आहेत.”, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

    पत्रकार परिषदेत पंकजा म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारने अद्यापही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नाही. अद्यापही इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यामागे सरकारचा हात आहे. सरकारने योग्य निर्णय घेतले असते तर संप चिघळला नसता. हे तीन तिघाडी सरकार असून यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. सरकारने योग्य पावलं उचलली असती तर OBC आरक्षण टिकलं असतं. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

    पंकजा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, तर राज्याच्या बाहेर गेल्यावर पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण देऊन काम करत होते. आता लोक तुमच्या महाराष्ट्रात काय चाललंय, असं विचारत आहेत. सत्ता परिवर्तनानंतर आघाडी सरकार आलं. त्यांनी जनहिताचं काम करायला हवं होतं, पण केलं नाही. अनुभवी नेते सत्तेत आहेत. त्यांना जनतेची नाडी माहिती आहे. त्यांनी जनहिताची कामे करायला हवी. मात्र, ती केली नाहीत.