Param Bir Singh Case: आयोगासमोर हजर रहा अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीला सामोरे जा; चांदीवाल आयोगाची परमबीर सिंग यांना तंबी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगारमोर वारंवार गैरहजर राहणार्‍या परमबीर सिंह यांना आयोगासमोर हजर हा अन्यथा वॉरंटला सामोरे जा, अशी तंबी गुरुवारी दिली आहे(Param Bir Singh Case: Appear before the Commission or face execution of warrant; Congratulations to Parambir Singh of Chandiwal Commission).

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगारमोर वारंवार गैरहजर राहणार्‍या परमबीर सिंह यांना आयोगासमोर हजर हा अन्यथा वॉरंटला सामोरे जा, अशी तंबी गुरुवारी दिली आहे(Param Bir Singh Case: Appear before the Commission or face execution of warrant; Congratulations to Parambir Singh of Chandiwal Commission).

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे पत्र लिहिले. या पत्रातून सिंग यांनी देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. उच्च न्यायालयानेही या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत चौकशी सुरू केली आहे. त्यावर गुरुवारी परमबीर सिंह यांचे वकिल आयोगासमोर हजर होते. तेव्हा, परमबीर यांना आयोगासमोर हजर राहण्यास सांगा, अजामीनपात्र वॉरंट अद्यापही लागू असल्याची माहितीही त्यांना द्या, अन्यथा पोलिसांना त्याच्यांविरोधात जामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जातील, असे आयोगाने बजावले. तसेच परमबीर सिंह कुठे आहेत अशी विचारणा आयोगाकडून करण्यात आली. त्यावर परमबीर मुंबई असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली.

    दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची चांदीवाल आयोगासमोर उलटतपासणी घेण्यात आली. देशमुख यांनी वाझे यांना पैसे गोळा करण्यास सांगितले. तेव्हा, संजीव पालांडे उपस्थित असल्याचा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केला आहे. त्यावर आपण या वर्षी फेब्रुवारीमध्ये गृहमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी येथे भेट दिली होती आणि गृहमंत्र्यांचे सचिव म्हणून त्यांना ओळखत असल्याचे वाझे यांनी मान्य केले. मात्र, पालांडे यांनी आपल्याकडे पैशांची मागणी केलेली नसल्याचे वाझे यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

    दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर सिंह यांनी तपासात सहभागी झाले. सिंग जवळपास २३० दिवसांनी गुरुवारी मुंबईत आले. खंडणी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा युनिट ११ कडून त्याचा जबाब नोंदवला जात आहे. सिंग यांच्यावर चौकशी आणि वॉरंट व्यतिरिक्त खंडणीसंदर्भात अनेक एफआयआर दाखल आहेत. सिंह शुक्रवारी चांदीवाल आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता आहे.