देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करून खळबळ माजवणारे परमबीरसिंह दोन महिन्यांच्या रजेवर

स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे परमबीर हे 5 मे पासून सुट्टीवर गेले असल्याचे समोर येत आहे. मुंबई पोलिस खात्यातील पोलिस निरीक्षकाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे परबीरसिंग यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे तब्बल 2 महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला परमबीर सिंह हे चंदिगड येथे असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे.

    तेथील एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे परमबीर हे 5 मे पासून सुट्टीवर गेले असल्याचे समोर येत आहे. मुंबई पोलिस खात्यातील पोलिस निरीक्षकाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे परबीरसिंग यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.

    मात्र, राज्याच्या गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर 5 मे पासूनच परमबीरसिंग हे त्यांच्या कार्यालयात येत नसल्याचे समोर आले आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या कार्यालयाचा अतिरिक्त भार हा सिव्हिल डिफेन्सचे प्रमुख आयपीएस के व्यंकटेशन यांच्याकडे देण्यात आलेला असल्याचे समोर आले आहे.