पालिका कर्मचा-यांसाठी सुरू असलेला गटविमा सन २०१७ पासून बंद करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात यासाठी सुमारे १५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र विमा कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने गटविमा योजना पालिकेला सुरू ठेवता आली नाही.
मुंबई – मुंबई महापालिकेतील कर्मचा-यांना गटविम्यापोटी वार्षिक १२ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. मात्र गेल्या चार वर्षांची प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये याप्रमाणे प्रत्येक कामगाराला ४८ हजार रुपये थकबाकी आहे ती देण्याची मागणी कामगार संघटनांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
पालिका कर्मचा-यांसाठी सुरू असलेला गटविमा सन २०१७ पासून बंद करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात यासाठी सुमारे १५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र विमा कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने गटविमा योजना पालिकेला सुरू ठेवता आली नाही.
सन २०१७ ते २०२१ या गेल्या चार वर्षांचे गटविम्याचाचे सहाशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत आहेत. त्यामुळे कामगारांची थकबाकी तातडीने द्यावी, अशी मागणी मुंबई महापालिका कामगार कृती समितीचे निमंत्रक अॅड प्रकाश देवदास यांनी केली आहे.