गणपती नंतरचे पुढील १५ दिवस धोक्याचे, मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीसाठी BMC उभारणार २६६ केंद्रे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सध्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. मात्र गणेशोत्सवानंतर रुग्ण संख्येत वाढ दिसून येण्याची शक्यता आहे.

    कोरोनाच्या तीसऱ्या लाटेच्या covid third wave दृष्टीने गणेशोत्सवानंतरचे १५ दिवसमहत्त्वाचे असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी Suresh Kakani, lAS यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता बाहेरुन आलेल्यांवर पालिकेचे BMC लक्ष असणार आहे. मुंबईत बाहेरुन आलेल्यांनी कोरोना चाचणीकरुन घेण्याचे आवाहन देखील काकाणी यांनी केलं आहे.

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सध्या बाधित रुग्णांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. मात्र गणेशोत्सवानंतर रुग्ण संख्येत वाढ दिसून येण्याची शक्यता आहे.

    गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर कोरोनाचा प्रसार वाढल्याचे आढळून आले होते. गणेशोत्सव काळात बाजारपेठेत खरेदीनिमित्त लोकांची वर्दळ वाढली होती. तसेच या काळात भेटीगाठी वाढतात. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी विशेषतः कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे मुंबईत परत येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेने मुंबईत २६६ चाचणी केंद्रे सुरू केली आहेत.

    दरम्यान, पाचव्या सेरो सर्वेत अँटीबॉडीज प्रमाण मुंबईकरांमध्ये ८६.८६ टक्के आढळून आलं आहे. यात काही लोकांची व्हॅक्सिन घेतलं होतंत्यांच्यामध्ये ९० टक्के जणात अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. तर व्हॅक्सिन व घेतलेल्यांमध्ये ८० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.