भाजपशासित राज्यात लोकांचा आवाज दाबला जातोय पण महाराष्ट्र गप्प बसणार नाही – संजय राऊत

गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली आहे. यावर महाराष्ट्रातले भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहेत? असा सवाल शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली आहे. यावर महाराष्ट्रातले भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहेत? असा सवाल शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
    खासदार राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज संघर्ष याचं प्रतिनिधीत्त्व गेल्या 70 वर्षांपासून करत आहे. समितीनं त्यासाठी रक्त सांडलं आहे, बलिदान दिलं आहे. बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरात त्याचा निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं या घटनेचा लोकशाही मार्गानं निषेध केला आहे. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला असेल तर त्यांच्यावर कायद्यानं कारवाई करावी.’
    बेळगाव, निपाणीसह कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी बांधवांर कर्नाटक सरकारडून दडपशाही केली जात आहे. आता कर्नाटक सरकार मराठी बांधवांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्याचा विचार करत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही माहिती दिलीय. तर बंदी घालून दाखवाच, असं आव्हान देखील शिवसेनेन कर्नाटक सरकारला आव्हान दिले आहे.
    दरम्यान, बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अवमानप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेकप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केली. या प्रकरणाचे राज्यातही ठिकठिकाणी पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.