खासदार संजय राऊत यांच्याविरोधात महिलेची याचिका ; न्यायालयात याचिका केल्यावर खोट्या प्रकरणात अटक केल्याचा आरोप

साल २०१३ आणि २०१८ मध्ये कलिना येथे राहणाऱ्या डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांचा पाठलाग करून जिवे मारण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे. यामागे राऊत यांचाच हात असून त्यासंदर्भात माहीम आणि वाकोला या दोन्ही पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केला आहे. या प्रकरणी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी याचिकेमार्फत केली आहे.

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या महिलेला बोगस डीग्रीच्या खोट्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्यावतीने मंगळवारी करण्यात आला. त्याची गंभीर दखल घेत थेट मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने लक्ष देऊन भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

    साल २०१३ आणि २०१८ मध्ये कलिना येथे राहणाऱ्या डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांचा पाठलाग करून जिवे मारण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे. यामागे राऊत यांचाच हात असून त्यासंदर्भात माहीम आणि वाकोला या दोन्ही पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केला आहे. या प्रकरणी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी याचिकेमार्फत केली आहे.

    मंगळवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावमी पार पडली. आपण राऊत यांच्याविरोधात फौजदारी याचिका दाखल केल्यामुळेच या महिलेविरोधात खोटा गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील आभा सिंह यांनी खंडपीठाला दिली. मात्र, या तोंडी आरोपांचा याचिकेत कुठेही उल्लेख नाही असे खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सांगत याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणी गुरूवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.