‘अब की बार ११५ पार’ दरवाढीची ‘हॅट्रीक’ सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईमुळं जनता मेटाकुटीला आली आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज नवनवे विक्रम करत आहेत. आजही सलग तिसऱ्या दिवशी  पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने दरवाढीची ‘हॅट्रीक’ झाली आहे. शुक्रवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

  मुंबई : कोरोनाच्या संकट अजून असताना, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईमुळं जनता मेटाकुटीला आली आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ दररोज नवनवे विक्रम करत आहेत. आजही सलग तिसऱ्या दिवशी  पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने दरवाढीची ‘हॅट्रीक’ झाली आहे. शुक्रवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

  पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०६.८९ आणि ९५.६२ रुपये इतका आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर ११२.७८ रुपये इतका आहे. तर एका लिटर डिझेलसाठी १०३.६३ रुपये मोजावे लागत आहेत. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच ११५ रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळं जनता महागाईनं त्रस्त झाली असून, जगयाचं कसं? असा संतप्त सवाल जनतेनं उपस्थित केला आहे.

  मागील २२ दिवसात ५ रुपयांनी वाढ

  आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर १५ पटींपेक्षा जास्त वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत पेट्रोल ५.१५ रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेल ५ रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी  पुन्हा एकदा वाढ करण्यात आल्याने दरवाढीची ‘हॅट्रीक’ झाली आहे. शुक्रवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली.

  कच्च्या तेलाचे दर भडकले

  सध्या कच्च्या तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर ८० डॉलर्स प्रतिबॅरलच्या आसपास आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड ९० डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, आणि भविष्यात आणखी दरवाढ होईल असं तज्ज्ञांचा म्हटल आहे.

  इंधनावर कर

  भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्कावर आधारित इंधनाचे दर राज्यानुसार बदलतात. याशिवाय, केंद्र सरकार इंधनावर उत्पादन शुल्क लावते. आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या १५ दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. त्यामुळं इंधनाचे कर दररोज विक्रम प्रस्थापित करत आहेत.

  कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे भाव

  दररोज पेट्रोल-डिझेलचे भावात बदल होत असतो. त्यामुळं तुम्हाला पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्यायच आहेत, मग आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून ९२२४९९२२४९  नंबरवर SMS पाठवावा. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२ या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता.