पेट्रोल-डिझेलच्या किंमती सलग चौथ्या दिवशी स्थिर, जाणून घ्या सध्याचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार कमी-जास्त होणारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव सलग चार दिवस स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव चार दिवसांत कमीही झालेले नाहीत आणि वाढलेले देखील नाहीत. गुरुवारी पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर या दरात कुठलाही बदल झालेला नाही. 

  आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी गेल्या सलग चार दिवसांपासून काहीसा दिलासा दिलाय.

  आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार कमी-जास्त होणारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव सलग चार दिवस स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव चार दिवसांत कमीही झालेले नाहीत आणि वाढलेले देखील नाहीत. गुरुवारी पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

  मुंबईत सध्या पेट्रोलची किंमत ९७ रुपये १९ पैसे, तर डिझेलची किंमत ८८ रुपये २० पैसै एवढी आहे. आगामी काळात क्रूड ऑईलच्या किंमती वाढल्या, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणं १ एप्रिलपासून पेेट्रोल आणि डिझेलवर कृषी सेस आकारायला सुरुवात होणार आहे. मात्र त्याचवेळी अगोदरचा सेस कमी केला जाणार आहे. त्याचाही परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होणार आहे.

  बघुयात, देशातल्या प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे भाव

  • मुंबई – ९७.१९/८८.२०
  • दिल्ली – ९०.७८/८१.१०
  • कोलकाता – ९०.९८/८३.९८
  • चेन्नई – ९२.७७/८६.१०