मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू, प्रकृती उत्तम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून, त्यांची प्रकृती उत्तम आणि  स्थिर आहे. सध्या  एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

    मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि  स्थिर आहे. सध्या  एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मान आणि पाठ दुखीच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मान आणि पाठ दुखीच्या त्रासामुळे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एच एन रिलायन्स रुग्णालयात (H N Reliance Hospital) दाखल झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

    मागील आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील शस्त्रक्रिया करण्यात आली. सिनिअर ऑर्थो सर्जन (Senior Ortho Surgeon) डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. जवळपास तासभर ही शस्त्रक्रिया चालली. सध्या मुख्यमंत्री ऑपरेशन थिएटरमध्येच (Operation Theater) आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि  स्थिर आहे. सध्या  एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

    मुख्यमंत्र्यांनी उपचार घेण्यापूर्वी एक निवेदन जारी केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ‘गेल्या वर्षांपासून आपण कोरोनाचा (Corona Virus) मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणले तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत. त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल. असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं होते.