विशेष आर्थिक प्रदेश सिप्झचा संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याची गरज, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांचे मत

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल(Piyush Goyal) यांनी सांताक्रुज इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रोसेसिंग विभाग (सिप्झ) विशेष आर्थिक प्रदेश (सेझ) याच्या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याची गरज व्यक्त केली.

    मुंबई : केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल(Piyush Goyal`s Conversation With Seepz Exporters) यांनी मुंबईतल्या सांताक्रुझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन (सिप्झ)(Seepz) येथील निर्यातदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पियुष गोयल(Piyush Goyal) यांनी सांताक्रुज इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रोसेसिंग विभाग (सिप्झ) विशेष आर्थिक प्रदेश (सेझ) याच्या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याची गरज व्यक्त केली.

    जुन्या इमारतींची अवस्था पाहून दुःखी
    गोयल म्हणाले की, १९७३ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा आणि जुन्या इमारतींची अवस्था पाहून मला दुःख होत आहे. सिप्झ हे उद्योगाचे गतिशील ऊर्जाकेंद्र बनू शकते. नवी दिल्लीतील प्रगती मैदानाचादेखील चार हजार कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात येत आहे. त्या धर्तीवर आपण जागतिक चटईक्षेत्राची संकल्पना इथे राबवू शकतो का? आयटीपीओ अर्थात भारत व्यापार प्रोत्साहन संस्था सीप्झमध्ये तीस हजार चौरस फुटांचे प्रदर्शन केंद्र उभारू शकते. गरज भासली तर त्याचा खर्च तसेच व्यवस्थापन सीप्झद्वारे केले जाईल, असे ते म्हणाले.

    ७३९ जिल्ह्यात वाणिज्य सप्ताह साजरा
    देशातील सर्व ७३९ जिल्ह्यात वाणिज्य सप्ताह साजरा करण्यासाठी २५० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अर्थव्यवस्थेसाठी विकासाचे इंजिन बऩण्यासाठी सर्व निर्यातदारांचे सहकार्य मिळाल्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी वाणिज्य सहसचिव अमिताभ कुमार देखील उपस्थित होते.