मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट; धारावीत दहशतवादी सापडल्यानंतर एटीएसकडून मुंब्रा परिसरातून आणखी एकाला अटक

गुप्तचर संस्थांच्या इशा-यानुसार अतिरेकी लोकल सेवांमध्ये किंवा फलाटावरील प्रवाशांच्या गर्दीत काही घातपात करण्याचा प्रयत्न दहशतवादी करू शकतात. या इशा-यानंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली आहे. त्याचवेळी, खबरदारी म्हणून स्थानकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर निर्बंध आले आहेत.

    मुंबई : दिल्ली पोलीसांनी संपूर्ण  देशाला हादरवून टाकण्या-या संभाव्य दहशतवादी षड्यंत्राचा पर्दाफार्श केल्यानंतर मुंबई एटीएसने धडक कारवाई मुंब्रा परिसरातून बॉम्बस्फोटांचा कट रचल्या प्रकरणी आणखी एका संशयीताला अटक केली आहे(Major Terror Attack in Mumbai). अटक केलेल्या संशयिताचे नाव इम्रान उर्फ ​​मुन्ना भाई असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी या प्रकरणात झाकीर हुसेन शेखला अटक करण्यात आली होती. झाकीरची चौकशी केल्यानंतर या संशयिताचे नाव समोर आल्याने एटीएसने मुंब्रा परिसरात छापा टाकला.

    प्रवाशांच्या गर्दीत काही घातपात करण्याचा प्रयत्न

    गुप्तचर संस्थांच्या इशा-यानुसार अतिरेकी लोकल सेवांमध्ये किंवा फलाटावरील प्रवाशांच्या गर्दीत काही घातपात करण्याचा प्रयत्न दहशतवादी करू शकतात. या इशा-यानंतर जीआरपीने मुंबईच्या सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली आहे. त्याचवेळी, खबरदारी म्हणून स्थानकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर निर्बंध आले आहेत.

    काल जोगेश्वरी आज मुंब्र्यात कारवाई

    दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने तीन दिवसांपूर्वी एका दहशतवादी षडयंत्राचा पर्दाफाश केला. या दरम्यान सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.  काल महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने झाकीर नावाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील जोगेश्वरी या ठिकाणाहून पकडले होते त्यानंतर आज मुंब्र्यात कारवाई करण्यात आली आहे.