पीएमसी बँकेच्या ग्राहकांना मिळणार दिलासा : ३ ते १० वर्षांत परत केली जाणार पूर्ण रक्कम ; रिझर्व बँकेने विलिनीकरणाची दिली परवानगी

पीएमसी बँकेचा एनपीए ९ टक्के होता. मात्र बँकेने हा आकडा केवळ १ टक्के दाखवला. बँकेने आपल्या सिस्टिममध्ये २५० कोटी रुपयांच्या बोगस ठेवी दाखवल्या. बँकेने कर्ज बुडवणाऱ्या HDIL, DHFL या कंपन्यांना नव्याने मोठ्या रकमेचे कर्जही दिले. हे कर्ज कंपन्यांचे संचालक, त्यांचे नातेवाईक किंवा पार्टनरच्या नावे दिले गेले. कर्जाची अधिक रक्कम देण्यासाठी, खोट्या ठेवीच्या रकमा दाखवण्यात आल्या.

  मुंबई :  पंजाब एँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह म्हणजे पेमसी या सहकारी बँकेच्या ग्राहकांना दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने, आरबीआयने पीएमसी बँकेचे विलिनीकरण युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत (USFB)करण्याला मंजुरी दिली आहे. आता पेमसी बँकेतील ग्राहकांना ३ ते १० वर्षांत त्यांचीं रक्कम परत केली जाणार आहे. या सौद्यांतरग्त पीएमसी बँकेच्या सर्व मालमत्ता, संपत्ती आणि कर्जदारांसहित सारी जमा रक्कम ही USFB ला दिली जाणार आहे.

  रिझर्व्ह बकेने जारी केला ड्राफ्ट
  पीएमसी बँकेतील ग्राहकांना त्यांनी जमा केलेली रक्कम ३ ते १० वर्षांत परत मिळणार आहे. यात USFB डिपॉझिट विम्यांतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतची हमी घेणार आहे. यापेक्षा ज्यांची रक्कम जास्त असेल त्यांना ३ वर्षांत ५० हजार रुपये तर पुढील चार वर्षांत १ लाख रुपये देण्यात येतील. त्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षांत ३ लाख रुपये देण्यात येतील. ५.५ लाख रुपये १० वर्षांत देण्यात येतील. बँकेच्या ८४ टक्के ग्राहकांना जमा केलेली रक्कम मिळालेली आहे.

  कोणतेही व्याज मिळणार नाही
  मार्च २०२१ नंतर पुढील पाच वर्षे कोणतेही व्याज ग्राहकांना मिळणार नाही, हेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. नंतर मात्र २.७५ टक्के इतके व्याज देण्यात येणार आहे. पीएमसी बँकेच्या एकूण १३७ शाखा असून, त्यात ११,६०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. युनिटी बँक ही दिल्लीची बँक सून ११०० कोटींनी ही बँक सुरु करण्यात आली आहे.

  याबाबत १० डिसेंबरपर्यंत आरबीआयने सूचना आणि तक्रारी मागवल्या आहेत. याबाबत कुणाच्याही काही तक्रारी असतील तर त्या तारखेपर्यंत त्यांनी कळवाव्यात असे सांगण्यात आले आहे. यानंतर पीएमसीचे विलिनीकरण होणार आहे.
  पीएमसीला काही दिवसांपूर्वी सेंट्रम आणि भारत पे ने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नुकतेच रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवरील बंदी डिसेंबरपर्यंत वाढवली होती. २०१९ साली घोटाळे उघडकीस आल्यानंतर, बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. तसेच बँकेवर अनेक प्रतिबंधही घालण्यात आले होते.

  घोटाळ्याचे संकेत फार पूर्वीच मिळाले होते
  HDIL, DHFL या वाधवान यांच्या कंपन्या होत्या. पीएमसी बँकेने HDIL सोबत आपल्या ठेवीत हेराफेरी केली. या बदल्यात HDIL कंपनीचा काळा पैसा बँकेत रोख ठेवीत दाखवण्यात आले. या वाढलेल्या कॅश डिपॉझिटची मर्यादा वाढवण्यात आल्याची माहिती आरबीआयला देण्यात आली नव्हती.

  बँकेचा एनपीए ९ टक्क्यांवर
  पीएमसी बँकेचा एनपीए ९ टक्के होता. मात्र बँकेने हा आकडा केवळ १ टक्के दाखवला. बँकेने आपल्या सिस्टिममध्ये २५० कोटी रुपयांच्या बोगस ठेवी दाखवल्या. बँकेने कर्ज बुडवणाऱ्या HDIL, DHFL या कंपन्यांना नव्याने मोठ्या रकमेचे कर्जही दिले. हे कर्ज कंपन्यांचे संचालक, त्यांचे नातेवाईक किंवा पार्टनरच्या नावे दिले गेले. कर्जाची अधिक रक्कम देण्यासाठी, खोट्या ठेवीच्या रकमा दाखवण्यात आल्या.