kirit somayya

दहा लाख ठेवीदार पीएमसी बँक घोटाळ्यामुळे त्रस्त आहेत.  ईडीला कोणतीही माहिती हवी असल्यास, त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही. सर्वांना पीएमसी बँकेचे पुनरुज्जीवन हवे आहे अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना बजावण्यात आलेल्या इडीच्या नोटीस बाबत प्रतिक्रिया दिली आहे.  

मुंबई : दहा लाख ठेवीदार पीएमसी बँक घोटाळ्यामुळे त्रस्त आहेत.  ईडीला कोणतीही माहिती हवी असल्यास, त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही. सर्वांना पीएमसी बँकेचे पुनरुज्जीवन हवे आहे अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना बजावण्यात आलेल्या इडीच्या नोटीस बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत परिवाराला पीएमसी बँक घोटाळा संबंधी, ईडीच्या नोटीसबद्दल मी ऐकले. संजय राऊत यांनी हे स्पष्ट करावे की , त्यांचे कुटुंब पीएमसी बँकचे लाभार्थी आहेत का? यापूर्वी कोणतीही चौकशी, नोटीसा आल्या आहेत का किंवा आल्या होत्या का?
असे सोमय्या म्हणाले.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली असून २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे.

मात्र, केंद्र सरकारकडून सुडाचे राजकारण होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केला जात आहे.
याबाबतच्या माहितीनुसार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती.
वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात व्यवहार झाले का? त्यामागील कारणे काय आहे हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी बोलावण्यात आले.