किरण मानेंच्या समर्थनार्थ राजकीय नेते मैदानात, केंद्र सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून मालिकेतून काढले, किरण मानेंची प्रतिक्रिया

स्टार प्रवाह चॅनलवर ‘मुलगी झाली हो…’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला विलास पाटील अर्थात अभिनेता किरण मानेला राजकीय भूमिका घेतो म्हणून किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून मालिकेतून सिरीअल मधून काढून टाकल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतं आहे. अभिनेता किरण मानेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आणि आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

    मुंबई : ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी कलाकार, साहित्यिक आणि कवी यांनी भूमिका घेतली पाहिजे असं नाशिक येथे म्हटले होते. यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या, त्यानंतर आता स्टार प्रवाह चॅनलवर ‘मुलगी झाली हो…’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला विलास पाटील अर्थात अभिनेता किरण मानेला राजकीय भूमिका घेतो म्हणून किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून मालिकेतून सिरीअल मधून काढून टाकल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतं आहे. अभिनेता किरण मानेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आणि आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण गाजत असतानाच आता यात राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी किरण मानेंना पाठींबा दिला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही किरण मानेला आपला पाठींबा दाखवत आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचा वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही असं म्हणत आव्हाड यांनी स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रशासनावर टीका केली आहे. तसेच कलावंत, कवी आणि साहित्यिक यांनी भूमिका घेतली तर, बिघडले कुठे असा सध्या सूर सोशल मीडियावर उमटत आहे.

    दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही किरण माने यांना आपला पाठींबा दर्शवत भाजपवर टीका केली आहे. या देशात कलावंतांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे, दरम्यान अभिनेता किरण मानेंना मालिकेतून काढून टाकल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.