मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता, शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

बीएमसी (BMC elections) निवडणुकीत काँग्रेससोबत अधिकृत आघाडी करण्याचा (Shivsena And Congress) शिवसेनेचाही इरादा नाही. मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या जागांवर शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या साथीने लढवण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं. बीएमसी (BMC elections) निवडणुकीत काँग्रेससोबत अधिकृत आघाडी करण्याचा (Shivsena And Congress) शिवसेनेचाही इरादा नाही. मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या जागांवर शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्धार वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आला होता.शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना मुंबई महापालिकेतील २२७ पैकी दोनशेहून अधिक जागा दशकानुदशकं स्वबळावर लढवत आली आहे.

मुंबईच्या काही पट्ट्यांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे तेही ८०-१०० जागांच्या खाली तडजोड करणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडीत सामावून घेणं सोपं जाणार नाही. असं सांगितले जात आहे.