कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, भाजपाची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी(Chief Minister should apologize) , अशी मागणी भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे. कांजूरमार्ग कारशेड (Kanjur Metro car shed) स्थगितीमुळे या प्रकल्पाचा खर्च पाच हजार कोटींनी वाढणार असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

मुंबई : मुंबई- आरेतील मेट्रो कारशेड (car shed)  कांजूरमार्गला हलविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता या मुळे सरकारची नाचक्की झाली असून, यामुळे मेट्रोचे काम पाच वर्षांनी विलंबाने होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी(Chief Minister should apologize) , अशी मागणी भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे. कांजूरमार्ग कारशेड (Kanjur Metro car shed) स्थगितीमुळे या प्रकल्पाचा खर्च पाच हजार कोटींनी वाढणार असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.

अपिलात जाण्याची संधी- अजित पवार

उच्च न्यायालयाने जरी कांजूर मेट्रो कारशेडला स्थगिती दिली असली, तरी याप्रकरणात पुन्हा न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय सरकारसमोर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच विकासाच्या कामात केंद्र आणि राज्य असा वाद न करता , राजकारण न आणता विकासकामे व्हायला हवीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

 

ही जमीन मेट्रो ६, ४ आणि १४ साठी उपयोगी पडेल – आदित्य ठाकरे

उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या कामास स्थगिती दिली आहे. भविष्यात बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यासाठी आम्ही तपशीलवार लेखी ऑर्डरची वाट पाहत आहोत. ही जमीन मेट्रो ६, ४ आणि मेट्रो १४ लाइनसाठी मेट्रो ३ वगळता निर्णायक आहे, कारण यामुळे जवळपास ५५०० कोटी रुपयांची सरकारची बचत होईल आणि १ कोटी नागरिकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण ठरेल.

भाजपच्या मागणीला फारसे महत्त्व नाही – अनिल परब

पूर्णपणे ऑर्डर वाचल्याशिवाय याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही, भाजपाला योग्य ते उत्तर देऊ, भाजपाच्या पाठिंब्यावर काही आदित्य ठाकरे मंत्री झालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागणीला फारसे महत्त्व नाही.