powai lake cleaning

पवई तलावाची (Powai Lake Cleaning) आजपासून पुन्हा जुन्या हार्व्हेस्टरच्या पद्धतीने मुंबई पालिकेने (BMC) स्वच्छता सुरू केली आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे, नगरसेविका चंद्रावती मोरे यांच्या हस्ते या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली.

    मुंबई : मुंबई (Mumbai) पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरच्या मध्यावर असलेल्या पवई तलावाची (Powai Lake Cleaning) आजपासून पुन्हा जुन्या हार्व्हेस्टरच्या पद्धतीने मुंबई पालिकेने (BMC) स्वच्छता सुरू केली आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे, नगरसेविका चंद्रावती मोरे यांच्या हस्ते या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी तलावात हार्व्हेस्टर मशीन चालवून या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.

    या अगोदर पालिकेने या तलावात ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करून जलपर्णी हटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. त्यानंतर आजपासून पुन्हा पालिकेतर्फे हार्व्हेस्टर मशीनच्या मदतीने या तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यात हे तलाव पूर्णपणे स्वच्छ केले जाणार आहे. लवकरच या तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबविण्याचा आणि या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प ही सुरू होणार असल्याची माहिती यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी दिली.