Power' of Pawar family ... Have you seen this photo shared by Supriya Sule?

मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेला एक सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फॅमिली गेट टुगेदरचा फोटो आहे. यात संपुर्ण पवार कुटुंबिय दिसत आहे. रोहित पवार यांनी पवार कुटुंबाची ‘पॉवर’ असे कॅप्शन देत हा फोटो रिट्विट केला आहे.

राजकारणात जसं पवारांचं मोठं नाव आहे अगदी त्याच पद्धतीने त्यांचं कुटुंब देखील मोठं आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येतं. असाच एक फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच वयाची ८० वर्ष पूर्ण केली. यानिमित्ताने कुटुंबियांनी देखील त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. त्यावेळी काढलेला हा फोटो आहे.

आपल्या माणसांनी दिलेले आशीर्वाद मनात जपा आणि आपल्याला जे मिळालंय, तुम्ही ज्या माणसांना ओळखता, तुम्ही माणूस म्हणून जसे घडले आहात, त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळेंनी हा फोटो शेअर केला आहे.