प्रदीप शर्मा अँटिलीया स्फोटकं प्रकरण आणि मनसूख हिरेन हत्याकांडांचा मास्टरमाईंड; एनआयएला सापडले महत्वाचे पुरावे

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. हिरेन हत्येप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते.

    मुंबई : अँटिलीया स्फोटकं आणि व्यावसायिक मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात मास्टरमाईंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले माजी पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांना सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि या कारचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. हिरेन हत्येप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते.

    मात्र, ठोस पुरावे हाती लागत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, याप्रकरणी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्या तपासात एनआयएला महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावरच प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

    सोमवारी पोलीस कोठडी संपत असल्यामुळे शर्मा यांना विशेष एनआयए न्यायालयात न्या. डी. ई. कोथळीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा, शर्मा यांची दोन्ही प्रकरणातील चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात यावी, अशी विनंती एनआयएच्यावतीने कऱण्यात आली. त्याची दखल घेत न्या. कोथळीकर यांनी शर्मा यांना १४ दिवसांची म्हणजेच १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.