
जानेवारीच्या मध्यापर्यंत तिन्ही पक्ष मिळून जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासोबत आमच्यासोबत आणखी काही पक्ष देखील येताहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार असल्याचं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या आम्ही प्रचाराला सुरुवात करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तर, MIM आमच्यासोबत नसून ते आमच्यासोबत नाराज आहेत,असं ते म्हणालेत. राजकारण हे रिलीजीयस पध्दतीनं व्हावं हा आमचा हेतू नाही. मागच्या युनियन वेळी एम आय एम आणि आम्ही एकत्र होतो. काँग्रेसचा पर्याय तेव्हाही होता आजही खुला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
BMC निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर तिसरी आघाडी म्हणून उतरण्याचा आमचा मानस आहे. बृहमुंबई महापालिकेच्या निवडणूकांबाबतची चर्चा सध्या अनेक सामाजिक संघटनांसोबत होते आहे. राजकीय पक्षांची एक युती म्हणून वंचित बहुजन आघाडी VBA, इंडियन युनियन मुस्लिम लिग IUML, राष्ट्रीय जनता दल RJD यांच्याशी बैठका होऊन युती करण्याचा निर्णय झाला आहे. आगामी महापालिका निवडणूकांच्या आधीच आम्ही ही युती जाहीर करत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
जानेवारीच्या मध्यापर्यंत तिन्ही पक्ष मिळून जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासोबत आमच्यासोबत आणखी काही पक्ष देखील येताहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार असल्याचं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या आम्ही प्रचाराला सुरुवात करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
VBA वर MIM नाराज
MIM आमच्यासोबत नसून ते आमच्यासोबत नाराज आहेत,असं ते म्हणालेत. राजकारण हे रिलीजीयस पध्दतीनं व्हावं हा आमचा हेतू नाही. मागच्या युनियन वेळी एम आय एम आणि आम्ही एकत्र होतो. काँग्रेसचा पर्याय तेव्हाही होता आजही खुला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
उच्च व सर्वोच्च न्यायालय घटना विरोधी
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी आहे. वारंवार कोव्हिडच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे चुकीचं आहे. आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.