हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार, प्रकाश आंबेडकर यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

भाजप , मनसे , रिपाइं या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

    मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा केला आहे. यावरून आता राज्यात गदारोळ सुरू झाला आहे. भाजप , मनसे , रिपाइं या पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

    मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले, हे स्पष्ट केलं आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. पण हे नेक्सस उभं राहिलेलं आहे. सोमवार, २२ मार्च रोजी राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. आम्ही भेटून आमची बाजू मांडणार आहोत, असे सांगत हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे हे दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.