ओबीसी आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकरांचा विधान भनवावर मोर्चा, परिसरात कलम १४४ लागू

विधानभवनावर आलेल्या या मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची मागणी कोर्टात लावून धरली नाही. म्हणून ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था पाहणं ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती घ्यावी. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे, ते सुरू राहणार. कारण तो आमचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तरी आमचं आंदोलन सुरू राहणार आहे.

    राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले आहेत. एकीकडे विरोधक आक्रमक झालेले असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. ओबीसी आरक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात आला.

    सध्या पोलीस या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलीस आणि मोर्चेकरी आमनेसामने आले आहेत. ओबीसी जातीनिहाय जनगणना व्हावी, राज्यातलं आरक्षण वाचलं पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

    ओबीसींना आरक्षण मिळालच पाहिजे, अशी मागणी करतच हे आंदोलक विधानभवन परिसरात धडकले. अचानक शेकडो कार्यकर्ते आल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली. तसा जमाव अधिक आक्रमक झाला.

    विधानभवनावर आलेल्या या मोर्चादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची मागणी कोर्टात लावून धरली नाही. म्हणून ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. म्हणून हा मोर्चा काढण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था पाहणं ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती घ्यावी. आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे, ते सुरू राहणार. कारण तो आमचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तरी आमचं आंदोलन सुरू राहणार आहे.

    दरम्यान, वंचितच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. त्यालाही आंबेडकरांनी आक्षेप घेतला. कशाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लावण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे झाल्यानंतर त्यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षणावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.