परिवहन मंत्र्यांनी समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे – प्रविण दरेकरांचे मत

परिवहनमंत्र्यांनी एसटी संपातून (MSRTC Workers Strike)समन्वयाने मार्ग काढावा,मेस्माचा (Mesma) बडगा हा अंतिम उपाय नव्हे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी केले.

    मुंबई : सरकार हिटलरशाही पद्धतीने काम करत आहे. सर्व एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या(MSRTC Merger In State Government)मागणीवर ठाम आहेत. परिवहनमंत्र्यांनी यातून समन्वयाने मार्ग काढावा,मेस्माचा (Mesma) बडगा हा अंतिम उपाय नव्हे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी केले.

    प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर पुढे म्हणाले की, आतापर्यंत ४३-४४ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. आजही ब्रेन हॅमरेज होऊन एक कर्मचारी गेल्याचे समजत आहे. मी स्वतः राज्यभर फिरतोय. सर्व डेपो कडेकोट बंद आहेत. विलिनीकरण मागणीसाठी जिवाची पर्वा करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. अशा वेळेला समन्वयातून मार्ग काढून विषय सोडवणे महत्त्वाचे आहे तर याउलट सरकार कारवाई करत आहे. निलंबन करत आहे. सेवा समाप्ती करत आहे. आता तर मेस्मासारखी कारवाई सरकार करण्याच्या विचारात आहे. सरकारला अशा पद्धतीने आंदोलन चिरडता येणार नाही. जे आंदोलक कर्मचारी आहेत त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढा. अशा प्रकारची जोरजबरदस्ती आणि सरकारी कायद्याचा इंगा दाखवून मेस्मा अंतर्गत कारवाई करू नये.

    ते पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांनाही माझे आवाहन आहे की आत्महत्या करू नका, टेन्शन घेऊ नका. जिवापेक्षा मोठे काही नाही. आंदोलकांनी सरकारबरोबर चर्चेची भूमिका घ्यावी आणि मार्ग काढावा तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशीही आमची भूमिका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांशी समन्वय साधत परिवहन मंत्र्यानी यातून मार्ग काढायला हवा. मेस्माचा
    बडगा हा अंतिम उपाय नव्हे.