pravin darekar padalkar and khot

महाराष्ट्राच्या राजकारणाचे (Maharashtra Politics) पॉवर सेंटर(Power Center) आता यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आदरणीय शरद पवार(Sharad Pawar) साहेबांकडे गेले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar)यांनी आज केली.

  मुंबई : एकेकाळी मातोश्री(matoshree) हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे पॉवर सेंटर होते. सरकार कोणाचेही असो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याकडे रिमोट कंट्रोल होता, त्यामुळे मातोश्री पॉवर सेंटर (Power Center) होतं. हे पॉवर सेंटर आता यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आदरणीय शरद पवार(Sharad Pawar) साहेबांकडे गेले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar)यांनी आज केली.

  संजय राऊत यांनी सांगितलं की, मोर्च्यामध्ये आग ओतण्याचे काम काही लोक करीत आहेत, त्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, संजय राऊत एसटी कर्मचाऱ्यांना मूर्ख समजत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांना सर्व कळतंय. एसटी कर्मचारी काही लहान बाळ नाही की त्यांना कळत नाही. त्यामुळे तुमची कोरडी सहानुभूती नको, तर विलिनीकरणावर बोला. कोरड्या सहानभूतीची एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यकता नाही. तुम्ही किती क्लुप्त्या करा व किती दबावशाही करा पण जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचारी माघार घेणार नाहीत असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

  आंदोलनाचा पोरखेळ सरकारने चालविला आहे. मंत्रालय सोडून अन्य ठिकाणी चर्चा कशाला करीत आहात. चर्चा करावयाची असतील तर रितसर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी तसेच सदाभाऊ खोत व गोपीचंद पडाळकर यांच्याबरोबर सरकारने चर्चा करावी. सरकारचा प्रतिष्ठेचा विषय असेल तर चर्चेसाठी सर्व एसटी कर्मचारीही येतील. पण आता अजून चर्चा तरी करायची आहे. सरकारने आता एका वाक्यात जाहीर करावे की, विलीनीकरण करणार की नाही व याचा निर्णय जाहीर करा असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

  सरकारमध्ये विलिनीकरण केल्यानंतर एसटी कशी नफ्यात आणायची व त्याचे आर्थिक गणित कसं जमवायचं ते देवेंद्रजी फडणवीस आपल्याला सांगतील, परंतु सरकारची विलिनीकरण करण्याची इच्छाच नाही. कारण तुमच्या पोटात एक आणि ओठात दुसरे आहे. सरकारच्या पोटामध्ये एसटीचे खासगीकरण करण्याचा डाव आहे असा आरोपही प्रविण दरेकर यांनी केला.
  मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी एकत्रित येऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घ्याव्या. आवश्यकता असेल तर दोन्ही विरोधी पक्षनेते व कर्मचारी प्रतिनिधी चर्चेसाठी येतील पण हा विषय मार्गी लावावा असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, खोत आणि पडळकर यांच्याबद्दल कोणाला जेलसी होत असेल तर आम्ही काय करणार. दोघेही नेते बहुजनांसाठी व कष्टकऱ्यांसाठी काम करतात. पण सरकार फक्त टीका करण्याचे काम करीत आहे.

  पुन्हा पुन्हा सरकारचे तेरावे घालण्याची वेळ येऊ देऊ नका. आमचे आंदोलन सनदशीर व शांततेच्या मार्गाने सुरु आहे. पण उद्या जर या कर्मचाऱ्यांची खरच माथी भडकली , तर एसटी कर्मचारी सरकारला सळो की पळो करून सोडतील आणि म्हणून सरकारने कर्मचाऱ्यांचा फार अंत पाहू नये असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.