Pravin Darekar's reply to Eknath Khadse's allegations

मुंबई :  सर्वांचीच चौकशी करा व सत्य जनतेसमोर येऊ द्या असे म्हणत विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादीचे नेते  एकनाथ खडसेंच्या(Eknath Khadse) आरोपांना उत्तर दिले आहे.

एकनाथ खडसे यांना काम दिसत नाही आणि राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपावर आरोप करत आहोत असे चित्र निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न करत आहे हे स्वाभाविकच आहे. पण, ज्या गोष्टीची चौकशी सुरु आहे व त्याचा निष्कर्ष जनतेसमोर येईल त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या चौकशीत कोणालाही पाठीशी घालण्याच कारण नाही त्याच्यावर योग्य ती चौकशी होऊन कारवाई होईल त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा बँक , अर्बन बँक किंवा पतपेढ्या ज्यांचे घोटाळे आहेत. मग ते कोणत्याही पक्षाचे असुदे एकदाच या सर्वांच्या चौकश्या लावा व सत्यस्थिती महाराष्ट्रातील जनतेसमोर आणा असे प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.

खडसे यांनी उल्लखे केलेल्या  अकराशे कोटी च्या कवडी मोलाच्या जमिनीवर दरेकर यांनी सवाल केला आहे की, राज्य सहकारी बँकेने  जे कारखाने लिलावात काढले आहे. त्याची किंमत सुमारे ५०० कोटी होती पण ते कारखाने १० कोटील विकले आहे यांची चौकशी प्रथम करा. बुलढाणा अर्बन बँक,  वर्धा बँक,  नागपूर बँक या ज्या बँक बुडविण्यात आल्या त्यांची चौकशी करा अशी मागणीही दरकेर यांनी केली.

राज्य सहकारी बँकेने अश्या ठिकाणी कर्ज दिले जिथे जिथे फक्त जागा आहेत. मात्र, प्रकल्प सुध्दा नाही अशा प्रकल्पांना कर्ज देण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा बँक, अर्बन बँक किंवा पतपेढ्या ज्यांचे घोटाळे आहेत. मग ते कोणत्याही पक्षाचे असुदे एकदाच या सर्वांच्या चौकश्या लावा व सत्यस्थिती महाराष्ट्रातील जनतेसमोर आणा म्हणजे प्रत्येक वेळेला पक्ष व नेते आपापल्या सोयीने चौकशीचे जे गु-हाळ उभं करतात ते महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.