९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

कोरोना नंतर किंवा कोरोनाच्या संकटानंतर मागील दीड वर्षानंतर साहित्य संमेलन पहिल्यांदाच होत आहे. मागील साहित्य संमेलन जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे होते. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोणामुळे लांबणीवर पडले होते. त्यामुळे साहित्य रसिकांना उत्सुकता लागून राहिले होती की, हे साहित्य संमेलन कधी होणार आहे. परंतु कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे देशाबरोबर राज्यातील विविध क्षेत्राना खुले करण्यात आले आहे. त्याचबरोबर साहित्य संमेलन होणार असल्याचे घोषणा सुद्धा करण्यात आली होती.

    नशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ३, ४ आणि ५ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे कुसुमाग्रजनगरी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुख्य व्यासपीठ आणि सभामंडप येथील आसन क्षमता जवळपास १०,००० च्या आसपास आहे. तसेच इथे आता खुर्च्यांची मांडणी पडद्यांची सजावट तसेच अन्य सभामंडपातील कामे, साहित्य संमेलन अवघे दोन दिवसांवर असल्यामुळे ही कामे अंतिम टप्प्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना नंतर किंवा कोरोनाच्या संकटानंतर मागील दीड वर्षानंतर साहित्य संमेलन पहिल्यांदाच होत आहे. मागील साहित्य संमेलन जानेवारी २०२० मध्ये उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे होते. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोणामुळे लांबणीवर पडले होते. त्यामुळे साहित्य रसिकांना उत्सुकता लागून राहिले होती की, हे साहित्य संमेलन कधी होणार आहे. परंतु कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे देशाबरोबर राज्यातील विविध क्षेत्राना खुले करण्यात आले आहे. त्याचबरोबर साहित्य संमेलन होणार असल्याचे घोषणा सुद्धा करण्यात आले होती. सध्या साहित्य संमेलन येथे कश्या प्रकारे तयारी सुरु आहे? काय आहे साहित्य संमेलन स्थळातील परिस्थिती याचा ‘नवराष्टने’ आढावा घेतला आहे.

    साहित्य संमेलन म्हटलं की वाद हा आलाच. आणि यातून नाशिकचे साहित्यसंमेलन सुद्धा वादाशिवाय अपवाद ठरू शकले नाही. या साहित्य संमेलनाला सुरुवातीपासूनच वादाचे गालबोट लागले आहे. उद्घाटक विश्वास पाटील यांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. परंतु हा वाद सुद्धा आता मिटला आहे. मात्र नाराजी कायम आहे.

    नाशिकमधील भुजबल नॉलेज सिटी या प्रशस्त जागेत कुसुमाग्रज नगरीत साहित्य संमेलन  होत आहे. या प्रशस्त जागेत कवी कट्टा, गझल कट्टा, हेसुद्धा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बुक स्टॉल, फूड स्टॉल, त्याचबरोबर नाशिकची ओळख असलेली खाद्यसंस्कृती याचीसुद्धा येथे मांडणी करण्यात येणार आहे. मुख्य सभा मंडपात १०,००० प्रेक्षक बसतील एवढी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोणाच्या दीड वर्षानंतर साहित्य संमेलन होत असल्यामुळे साहित्य संमेलनाचे प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली आहे.