बोरिस जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दडपण, ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे सुनक होणार विराजमान?

पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या अडचणीत सध्या वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात लॉकडाउनच्या कालावधीत बोरीस जॉन्सन यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबत डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये पार्टी केली होती. तेव्हापासून जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसून येत आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी जोर धरून आहे.

    लंडन : सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची जोरदार चर्चा सुरु आहे, याला कारण ही असेच आहे. कारण आता सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार का याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या अडचणीत सध्या वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात लॉकडाउनच्या कालावधीत बोरीस जॉन्सन यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यासोबत डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये पार्टी केली होती. तेव्हापासून जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसून येत आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी जोर धरून आहे. या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जॉन्सन आता राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.

    दरम्यान, कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातील काही नेते व विरोधक बोरिस यांनी पायउतार व्हावे हि मागणी करु लागले आहेत, जर बोरिस यांना राजीनामा द्यावा लागला तर, ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऋषी हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत तसेच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते व ब्रिटनचे वित्तमंत्री आहेत. २०२० मध्ये कोरोनामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरू असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन एका गार्डन पार्टीमध्ये सामील झाले होते. ही पार्टी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी झाली होती. लॉकडाऊनच्या नियमांचा पंतप्रधानच भंग करत असतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल टीकाकारांनी केला. तसेच विरोधकांनी सुद्धा त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे.

    दरम्यान, जर जॉन्सन यांना पंतप्रधापदावरुन राजीनामा द्यावा लागला तर, त्यांच्या जागी भारतीय वंशाचे सुनक हे पंतप्रधानपदी नियुक्ती होऊ शकते, त्यामुळं जॉन्सन यांना राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

    कोण आहेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक?

    ऋषी हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. तसेच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते व ब्रिटनचे वित्तमंत्री आहेत. ऋषी सुनक यांनी विचेंस्टर कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून आणखी उच्चशिक्षण घेतले. तसेच अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे. ब्रिटनमधील राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी ग्लोडमन सॅक्स, हेज फंड येथे काम केले होते. त्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट कंपनी सुरू केली. त्यांचे वडील डॉक्टर होते व आई औषधाचे दुकान चालवत होती. हे कुटुंब मूळचे पंजाबचे आहेत.