Extreme steps taken by employees due to non-receipt of salary for 3 months; Suicide of two ST employees in Jalgaon and Ratnagiri
प्रतिकात्मक फोटो

टाळेबंदीमुळे प्रवासी उत्पन्नावर पाणी साेडावे लागल्याने आर्थिक ताेटा भरुन काढण्यासाठी महामंडळाने गेल्या मे महिन्यापासून मालवाहतूक सुरू केली. प्रवासी गाड्यांमध्ये काहीअंशी बदल करून मालवाहतुकीसाठी ११५० ट्रक तयार केलेत.

    मुंबई: डिझेलचा दर वाढल्याने एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या प्रति किलोमीटर दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. गुरुवार एक जुर्लेपासून नवीन दरवाढ लागू हाेणार आहे. सुधारित दरानुसार प्रति किमी ४८रुपये आकारले जाणार आहे. सध्या प्रति किमी ४६ रुपये दर आहे.
    टाळेबंदीमुळे प्रवासी उत्पन्नावर पाणी साेडावे लागल्याने आर्थिक ताेटा भरुन काढण्यासाठी महामंडळाने गेल्या मे महिन्यापासून मालवाहतूक सुरू केली. प्रवासी गाड्यांमध्ये काहीअंशी बदल करून मालवाहतुकीसाठी ११५० ट्रक तयार केलेत. मालवाहतुकीमुळे महामंडळाचे उत्पन्न वाढत असले तरी डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ हाेत असल्याने मालवाहतुकीचे दर वाढविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळाला डिझेलचा पुरवठा इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलतात. महामंडळाला दिवसाला १ लाख लीटर डिझेल लागते. डिझेल खरेदीसाठी महामंडळ वर्षाला ३ हजार काेटींची तरतूद करते.त्यापैकी २ हजार ८०० काेटी डिझेलवर खर्च हाेतात. महामंडळाची १०० किमीच्या आतील मालवाहतूक माेठ्या प्रमाणात आहे. प्रति दिवस मालवाहतुकीसाठी ३,५०० रुपये भाडे निश्चित केले आहे. तसेच १०१ किमी ते २५० किमीच्या पर्यत प्रति किमी ४६ तर २५१ किमीच्या पुढे ४४रुपये प्रति किमी दर आकारण्यात येणार आहे.

    एसटीच्या मालवाहतूकीचा टाळेबंदीमधील तपशील
    फेऱ्या-९५ हजार
    उत्पन्न- ५६ काेटी रु.