प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा सिडको कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न, कीटकनाशक सदृश द्रव्याचे केले प्राशन

शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांच्याशी संबंधित विषय हा शासन दरबारी विचाराधीन असून त्याबाबतचा पाठपुरावा सिडकोतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. सदर वस्तुस्थिती ही दत्तू भिवा ठाकूर यांना त्यांचे  ७ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने सिडको महामंडळामार्फत २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. 

    नवी मुंबई – सिडको भवन, सीबीडी-बेलापूर, पहिला मजला, येथे सोमवारी एका दुर्दैवी घटनेमध्ये अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन) यांच्या कार्यालयामध्ये उरण धुतूम येथील शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी किटकनाशक सदृश्य द्रव्याचे प्राशन करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना सुमारे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झालेली आहे. दत्तू भिवा ठाकूर यांना तात्काळ एमजीएम रुग्णालय,सीबीडी-बेलापूर येथे नेण्यात आले व त्यांच्यावर पुढील उपचार चालू आहेत व आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांच्याशी संबंधित विषय हा शासन दरबारी विचाराधीन असून त्याबाबतचा पाठपुरावा सिडकोतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. सदर वस्तुस्थिती ही दत्तू भिवा ठाकूर यांना त्यांचे  ७ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने सिडको महामंडळामार्फत २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे.  सदर पत्र हे अर्जदार दत्तू भिवा ठाकूर यांनी स्वत: दिनांक  २२ ऑक्टोबर २०२१ रोजी सिडको कार्यालयात उपस्थित राहून स्विकारले आहे.  ठाकूर यांचे मौजे नवघर येथील संपादित जमिनीकरिता प्रलंबित विषयाबाबत निरसन करण्यात आले असून, याव्यतिरिक्त सिडको महामंडळाकडे कोणताही विषय अनुज्ञेय नाही.

    सिडकोने नेहमीच प्रकल्पबाधितांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच नवी मुंबई शहर उभारण्यात आले आहे. सदर दुर्दैवी घटना ही सिडको भवनमध्ये घडली असल्याने दत्तू भिवा ठाकूर यांच्या वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च हा सिडको महामंडळातर्फे उचलण्यात येत आहे.