पावसाळी औषधांच्या खरेदीचा प्रस्ताव आठ महिने महापौर कार्यालयात प्रलंबित; भाजपकडून चौकशीची मागणी

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महत्वाची असलेली पावसाळी औषधे खरेदीचा प्रस्ताव गेल्या ८ महिन्यांपासून महापौर कार्यालयात प्रलंबित असून या प्रस्तावाची फाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. फाईल गहाळ कशी झाली, कोणी गहाळ केली असा सवाल विचारत याबाबत निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे(Proposal for purchase of rainwater medicine pending in the mayor's office for eight months; BJP demands inquiry).

    मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महत्वाची असलेली पावसाळी औषधे खरेदीचा प्रस्ताव गेल्या ८ महिन्यांपासून महापौर कार्यालयात प्रलंबित असून या प्रस्तावाची फाईल गहाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. फाईल गहाळ कशी झाली, कोणी गहाळ केली असा सवाल विचारत याबाबत निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे(Proposal for purchase of rainwater medicine pending in the mayor’s office for eight months; BJP demands inquiry).

    महापालिका मध्यवर्ती खरेदी खाते यांनी १७३ औषधांच्या प्रस्तावित खरेदीकरिता ई – निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रिया ३१ जुलै २०२० ला पूर्ण झाली होती. मात्र या मसुदा पत्रातील काही बाबींच्या खर्चास मान्यता देण्याचे अधिकार महापौरांना असल्यामुळे हे मसूदा पत्र ३० सप्टेंबर २०२० ला महापौर कार्यालयाकडे पाठवण्यात आले.

    भाजपकडून सप्टेंबर २०२० ते मे २०२१ या आठ महिन्यात महापौरांना १८ स्मरणपत्रे पाठवून लक्ष वेधण्यात आले. मात्र या एकाही पत्राचे उत्तर अथवा मसुदापत्र फाईल मध्यवर्ती खात्याला मिळालेले नाही. ही औषधे पावसाळ्यात साथीच्या आजारांसाठी असल्याने महत्वाचे होते. मात्र असे असतानाही या प्रस्तावाकडे महापौर कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. दरम्यान यासंबधीत असलेली फाईल महापौर कार्यालयाकडे ८ महिने प्रलंबित राहिली व नंतर फाईल गहाळ झाल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

    हा प्रस्ताव महापौर कार्यालयातून गहाळ झाल्यामुळे प्रस्तावाचे दुय्यम पत्र ९ नोव्हेंबर रोजी झालेल्य़ा स्थायी समितीसमोर सादर केले. दरम्यान या प्रस्तावात काही निविदाकारांनी विधिग्राह्यता वाढवून देण्यास नकार दिल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे निविदाकारांना वाटप झालेल्या बाबींसाठी पुन्हा निविदा मागवाव्या लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिका रुग्णालयांना औषधे मिळण्यास अधिक विलंब होणार आहे. महापौर कार्यालयाकडून हा हलगर्जीपणा करण्यात आल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.