आदित्य ठाकरेंच्या बंगल्याबाहेर राडा, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटक

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेड संघटनेनं आंदोलन केलं आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती. पण संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं.

    मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेड संघटनेनं आंदोलन केलं आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती. पण संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं.

    आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. यावेळी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी आणण्यात आले आहे.

    मागण्या काय आहेत?

    • मराठा समाज व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे.
    • सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांचा रखडवलेल्या नियुक्त्या तात्काळ द्याव्यात.
    • मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे.
    • सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी.
    • मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे.