राहुल गांधींच्या शिवाजी पार्कवरील सभेला राज्य सरकारने परवानगी नाकारली, भाई जगताप यांची उच्च न्यायालयात धाव

यंदाचा २८ डिसेंबर हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ व्या स्थापना दिवस असून जाहीर सभा घेण्याच्या उद्देशाने २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी पक्षाकडून राज्य सरकारकडे मागण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यासाठी मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांची शिवाजी पार्क येथे २८ डिसेंबर रोजी सभा आयोजित केली आहे. त्याबाबत ऑक्टोबर २०२१ रोजी या मेळाव्याबाबत राज्य सरकारकड़े अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

    मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या पक्षाच्या नियोजित मेळाव्याला परवानगी देण्याचे राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेतून कऱण्यात आली आहे.

    यंदाचा २८ डिसेंबर हा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३७ व्या स्थापना दिवस असून जाहीर सभा घेण्याच्या उद्देशाने २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी पक्षाकडून राज्य सरकारकडे मागण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यासाठी मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांची शिवाजी पार्क येथे २८ डिसेंबर रोजी सभा आयोजित केली आहे. त्याबाबत ऑक्टोबर २०२१ रोजी या मेळाव्याबाबत राज्य सरकारकड़े अर्ज दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत या अर्जावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या विस्तीर्ण मैदानावर एका भागात तात्पुरता रंगमंच उभारण्यासाठी आणि सार्वजनिक सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका भाई जगताप यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

    सदर याचिकेवर सोमवारी न्या. ए. ए सय्यद यांच्यासमोर प्राथमिक सुनावणीसाठी पार पडली. तेव्हा, पालिका आणि आरोग्य विभागाने विहित केल्या सर्व निकषांचे पालन करण्यात येईल, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, शिवाजी पार्क `सायलेन्स झोन’ म्हणून घोषित केला आहे. मात्र, येथे निवडक कार्यक्रम आयोजित करण्यास मूभाही देण्यात आली आहे. त्यात ६ डिसेंबर (डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी), १ मे (महाराष्ट्र स्थापना दिवस) आणि २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) समावेश आहे. त्यानंतर पालिकेकडून वर्षातून ४५ दिवस क्रीडाबाह्य उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले असून ४५ दिवसांपैकी ११ दिवस विविध उपक्रमांसाठी ठेवण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षीचे ११ दिवस शिल्लक असल्याचे जगताप यांच्यावतीने बाजू मांडताना अँड. प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी मंगळवारी पुन्हा घेण्याचे निश्चित केले.