विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे मालामाल! तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेने केली २०० कोटींची कमाई

बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने नियमितपणे उपनगरीय, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. महसुलाची गळती रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे दक्षता पथक तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह विनातिकीट प्रवासाविरुद्ध अशा मोहिमा राबवत असतात. एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ (१.४.२०२१ ते १६.३.२०२२) या कालावधीत एकूण ३३.३० लाख प्रकरणे आढळून आली आणि रु. २००.८५ कोटींचा महसूल जमा झाला जो सर्व क्षेत्रिय रेल्वेमध्ये प्रकरणे आणि महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक आहे. . कोविड-१९ निर्बंध असूनही मध्य रेल्वेची आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई आहे(Railway freight due to passengers traveling without tickets! Central Railway earns Rs 200 crore from ticket inspection).

    मुंबई : बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने नियमितपणे उपनगरीय, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. महसुलाची गळती रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे दक्षता पथक तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह विनातिकीट प्रवासाविरुद्ध अशा मोहिमा राबवत असतात. एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ (१.४.२०२१ ते १६.३.२०२२) या कालावधीत एकूण ३३.३० लाख प्रकरणे आढळून आली आणि रु. २००.८५ कोटींचा महसूल जमा झाला जो सर्व क्षेत्रिय रेल्वेमध्ये प्रकरणे आणि महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक आहे. . कोविड-१९ निर्बंध असूनही मध्य रेल्वेची आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई आहे(Railway freight due to passengers traveling without tickets! Central Railway earns Rs 200 crore from ticket inspection).

    मुंबई विभागाने तिकीटविरहित आणि अनियमित प्रवासाची १२.९३ लाख प्रकरणे शोधून काढली असून रु. ६६.८४ कोटी वसूल केले आहेत जे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक आहेत. भुसावळ विभागात अनियमित प्रवासाची ८.१५ लाख प्रकरणे आढळून आली असून ५८.७५ कोटी रुपये, नागपूर विभागात ५.०३ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून ३३.३२ कोटी, सोलापूर विभागात ३.३६ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून १९.४२ कोटी,  पुणे विभागात २.०५ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून १०.०५ कोटी आणि मुख्यालयाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची १.८० लाख प्रकरणे शोधून काढली आणि रु. १२.४७ कोटी वसूल करण्यात आली.

    वरील व्यतिरिक्त या कालावधीत सर्व ५६,४४३ व्यक्ती कोविड योग्य वर्तनाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि मास्क न परिधान केल्याबद्दल आढळून आले आणि त्यांच्याकडून ८८.७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

    गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी तसेच स्वतः च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड-१९ योग्य वर्तनाचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीटांसह प्रवास करण्याचे आवाहन करत आहे.