राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’ गेला, राज यांच्या परिवारातील श्वानाचे निधन

राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा असणारा ग्रेट डेन जातीचा कुत्रा जेम्स काळाच्या पडद्याआड गेल्याचं वृत समोर आलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याबरोबर जेम्स नावाचा ग्रेट डेन प्रजातीचा कुत्रा होता. अखेर वयोमानाने काल रात्री जेम्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचा असणारा ग्रेट डेन जातीचा कुत्रा जेम्स काळाच्या पडद्याआड गेल्याचं वृत समोर आलं आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याबरोबर जेम्स नावाचा ग्रेट डेन प्रजातीचा कुत्रा होता.

    अखेर वयोमानाने काल रात्री जेम्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज ठाकरे यांचा अतिप्रिय असलेल्या कुत्र्याच्या निधनाने त्यांना चांगलाच धक्का बसल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरेंकडे ग्रेट डेन या जातीचे तीन कुत्रे होते. त्यापैकी बॉंंड आणि शाॅन यांचं यापुर्वीच निधन झालं होतं.

    दरम्यान तीन ग्रेट डेनपैकी राहिलेला एक जेम्स हा देखील काल काळाच्या पडद्याआड गेल्याने राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांच्या घरातील व्यक्ती व ते स्वत: कुत्र्यांवर घरातील व्यक्ती प्रमाणेच प्रेम करत होते व त्यांना कुत्र्यांबद्दल खूप प्रेम देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जेम्स हा राज ठाकरे यांच्याबरोबर होता. त्यामुळे त्याच्याबद्दल विशेष प्रेम आणि कळवळा राज ठाकरे यांना होता, तसेच वयोमानानुसार जेम्सचं काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झालं आहे.