वाझेनं कुणाच्या तरी सांगण्यावरून स्फोटकं ठेवली, केंद्र सरकारने चौकशी करावी, राज ठाकरेंची मागणी

या प्रकऱणाची केंद्र सरकारनं निष्पक्ष चौकशी केली, तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील, असा दावा राज ठाकरेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी चांगले संबंध असताना पोलिस का त्यांना धमकावायला, घाबरवायला किंवा पैसे उकळायला जातील, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे उद्योगपती मुकेश अंबानींशी मधुर संबंध आहेत. सचिन वाझेचे शिवसेेनेशी मधुर संबंध आहेत. त्यामुळे हे केवळ पोलिसांमधील अंतर्गत वादाचं प्रकरण नसून मोठ्या गुंतागुंतीचं प्रकरण आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. कुणाच्या तरी आदेशाशिवाय पोलीस अंबानींच्या घरापाशी बॉम्ब ठेवण्याचं धाडस करणार नाहीत, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

    या प्रकऱणाची केंद्र सरकारनं निष्पक्ष चौकशी केली, तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील, असा दावा राज ठाकरेंनी केलाय. मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी चांगले संबंध असताना पोलिस का त्यांना धमकावायला, घाबरवायला किंवा पैसे उकळायला जातील, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

    मुकेश अंबानी यांना मध्यप्रदेश सरकारची सुरक्षा आहे. शिवाय इस्त्रायली कमांत्डोची सुरक्षाही त्यांच्यासाठी तैनात आहे. त्यांच्या घरापासून दोनवेळा कुणी जाताना दिसलं, तरी त्याची हटकून चौकशी केली जाते. अशा परिस्थितीत स्फोटकांनी भरलेली एक गाडी २४ तास तिथं कशी राहू शकते आणि ती बाब कुणाच्याही लक्षात येणार नाही, असं कसं होऊ शकतं, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय.

    गाडीत सापडलेलं धमकीचं पत्र एखाद्या गुजराती माणसानं लिहिलं असावं, असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. या पत्रात मुकेश भाई आणि निता भाभी असा उल्लेख असल्याकडं त्यांनी लक्ष वेधलंय. ज्याला धमकी द्यायचीय, त्याला कुणी प्रेमाने आणि आदराने भाई किंवा भाभी कसं म्हणू शकतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.